vegetables in the market regarding hygiene charges 
कोल्हापूर

तुम्हाला पाच रुपये कशासाठी द्यायचे; पावतीवर ना शिक्का, ना तारीख

सुनील पाटील

कोल्हापूर : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत भाजीपाला बाजारात गोळा केल्या जाणाऱ्या स्वच्छता शुल्क पावतीवर कोणताही प्रकारचा शिक्का किंवा तारीख नसतानाही प्रत्येक विक्रेत्यांकडून पाच रुपये स्वच्छता शुल्क आज जमा केले. शहरातील विविध मार्केटमध्ये याच पावत्या देऊन हे शुल्क जमा केले जाते होते. त्यामुळे ज्या पावतीवर शिक्का किंवा तारीख नाही, अशा पावत्या दिल्या जात असल्याची माहिती तेथील एका विक्रेत्यांने ‘सकाळ’ला दिली. त्यानुसार तिथे पावती देऊन पैसे जमा करणाऱ्यांचा माग घेतला. 


 रेल्वेफाटक शेजारी असणाऱ्या भाजीपाला विक्री मार्केटमध्ये दोन तरुणांकडून पाच रुपये शुल्क असलेली पावती दिली जात होती. पावती घेण्याआधी आज स्वच्छतेसाठी कोणीही आले नाही. आम्ही स्वत:हून बाजारात आपआपल्या ठिकाणाची झाडलोड केली आहे. तुम्हाला पाच रुपये कशासाठी द्यायचे, असाही सवाल विक्रेत्या महिला व पुरुषांकडून केला जात होता; पण नाईलाज म्हणून हे विक्रेते पावतीवर कोणत्याही प्रकारचा शिक्का किंवा तारीख नसतानाही पाच रुपये देवून पावती घेत होते. 


कोल्हापूर महापालिका व एकटी संस्था संचलित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प भाजीपाला मार्केट अशा नावाने दररोज प्रत्येक पाच रुपये जमा करतात. जमलेले पैसे कचरावेचक महिलांना दिले जातात. हा कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या महिलांना जमा झालेली रकक्‍म दिली जाते; पण महापालिका व एकटी संस्थेकडून अशा प्रकारच्या पावत्या देत असताना त्यावर शिक्का किंवा तारीख असणे गरजेचे आहे. महापालिकेनेही याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. 


पण आज सायंकाळी साडे सहा ते पावणे सातच्या दरम्यान रेल्वे फाटकाजवळ असणाऱ्या भाजीपाला विक्री मार्केटमध्ये दोघेजण विनाशिक्का आणि तारखेची पावती देवून प्रत्येकी पाच रुपये जमा करत होते. पावती देवून पैसे जमा करणारे आम्ही अशाच पावत्या देतो. शहरातील सर्व बाजारात अशाच पावत्या देतो, तारीख लिहायला वेळ लागतो, अशी कारणे सांगत होता. वास्तविक ज्यांच्याकडे हे काम आहेत, त्यांनी याची काळजी घेणे आवश्‍यक होते; पण असे होत नसल्याने उद्या कोणीही अशा पावत्या छापून स्वच्छता शुल्क आकारण्यास जराही घाबरणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.  

रेल्वे फाटक शेजारी स्वच्छता शुल्क पावतीवर तारीख व शिक्का नव्हता. हे नजर चुकीने झाले आहे. येथून पुढे पावतीवर आवश्‍यक सर्व बाबी नमूद केल्या जातील. याची कटाक्षाने काळजी घेतली जाईल.
- वनिता कांबळे, समन्वयक, एकटी संस्था. 

पावतीतून मिळणारे सर्व शुल्क कचरा वेचक महिलांना दिले जाते; पण पावतीवर तारीख, शिक्का असणे गरजेचे आहे. विना तारीखेच्या पावत्या देऊ नयेत. काही दिवसांसाठी बाहेर होते. याची माहिती घेऊन योग्य ती दुुरुस्ती व कारवाई केली जाईल. 
-अनुराधा भोसले, एकटी संस्था, कोल्हापूर. 


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT