kolhapur today update,kolhapur live, kolhapur marathi, kolhapur news 
कोल्हापूर

गुन्हे थेट रेकॉर्डवर: चार हजार रुपयेपासून लाखोंची वाहने मोबाईल चोरीची नोंद आता दप्तरी

राजेश मोरे

कोल्हापूर : वाहन असो अगर मोबाईल चोरी प्रकार त्याची नोंद थेट रेकॉर्डवर येण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. तशी पोलिस ठाण्यातील कच्ची तक्रार व गहाळ नोंदीचे प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. 


शहर परिसरात वाहन आणि मोबाईल चोरीचे प्रकार वारंवार घडतच आहेत. वाहनांची वयोमर्यादा त्याची कागदपत्रे आदीचा विचार करून संबधित मालकाकडून शक्‍यतो याबाबत पोलिस ठाण्यात कच्ची नोंदच केली जात होती. चोरट्याकडून मुद्देमाल सापडला तर तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कोर्टापर्यंत जाण्याचा त्रास वाचवा हा त्यामागील उद्देश होता. मोबाईल चोरीबाबत गहाळ दाखला घेऊन मोबाईलमधून सीम कार्ड बंद करण्याला पंसती दिली जायची. परिणामी वाहन व मोबाईल चोरीची नोंद होण्याचे प्रमाण कमी होते. कच्ची तक्रारीचा त्या ताकदीने तपास होत नसल्याने असे गुन्हे उघडकीस येण्यावर मर्यादा येत होत्या. 


पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्वसामान्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घ्या, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले त्याबाबत मी विचारणा करणार नाही; पण ज्या पोलिस ठाण्यातील गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी असेल त्या पोलिस ठाण्याकडे विचारणा केली जाईल असे स्पष्ट केले होते. तसे शहर परिसरात होणाऱ्या वाहन चोरीचे रेकॉर्ड होण्यास गती मिळाली. अगदी चार हजार रुपयेपासून लाखोंची वाहने मोबाईल चोरीची नोंद दप्तरी होऊ लागली. त्याचा तपासही सायबरसेलच्या मदतीने सुरू झाला. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT