कोल्हापूर

खरेदीच्या बहाण्याने वाहन चोरीचा फंडा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  घर खेरदीबाबतचा व्यवहार फायनल, टोकणचे पैसे घेऊन येणाऱ्या भावाला घेऊन येतो, जरा गाडीची किल्ली द्या, असे सांगून चोरट्याने स्टेशन रोडवरून भरदिवसा मोटारसायकल पळवून नेल्याचा प्रकार चार दिवसापूर्वी घडला. खरेदीच्या बहाण्याने विश्‍वास संपादन करत वाहनांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सुरू केला आहे. 

लक्षतीर्थ वसाहत येथील घर विक्रीची जाहिरात एका नोकरदाराने दिली. ती जाहिरात वाचून एका तरुणाने संपर्क साधला. मी व्यापारी आहे. मला घर घ्यायचे आहे. म्हणून तो घर पाहून गेला. आठ दिवसानंतर त्याने घर घेण्यास तयार असल्याचे नोकरदाराला सांगितले. सुरवातीला ठराविक रक्कमेचे टोकण देतो, असे सांगून स्टेशनरोडवर येण्यास सांगितले. 
तशी नोकरदार व्यक्ती पोहचली. त्यापूर्वीच तरूण तेथे उभा होता. त्याने भाऊ बॅंकेत नोकरीस आहे. थोड्यावेळाने भाऊ दसरा चौकातून पैसे घेऊन येत आहे. त्याला घेऊन येतो, असे सांगून त्या तरुणाने नोकरदार व्यक्तीकडून गाडीची किल्ली मागितली. विश्‍वासाने त्याला नोकरदाराने गाडीची किल्ली दिली. पण दहा ते पंधरा मिनिटानंतर तरूणाबे गाडी घेवून पोबारा केल्याचे नोकरदाराच्या लक्षात आले. त्याचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. दीड महिन्यापूर्वी दसरा चौकातून कुरिअरमध्ये काम करणाऱ्या तरूण जात होता. त्याच्याकडे एकाने लिफ्ट मागितली. त्यांने त्याला कसबा बावडा रस्त्यापर्यंत लिफ्टही दिली. ताराबाई पार्क येथील पार्लस देण्यासाठी तरूण मोटार सायकलवरून उतरला. गाडीला किल्ली तशीच ठेऊन तो गेला. लिफ्टच्या बहाण्याने मोटारसायकलवर बसलेल्या भामट्याने गाडी चोरून नेली. 

छडा लावण्याचे एसपींचे आदेश 
चोरट्यांनी असे वेगवेगळे फंडे वापरून वाहनांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. दुसरीकडे रस्त्याच्या बाजूला पार्किंग केलेल्या वाहन चोरीचे प्रकार वाढू लागले आहेत. अशा दुहेरी संकटामुळे वाहन मालकांच्या भितीचे वातावरण आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वाहन चोरट्याचा छडा लावण्याला प्राधान्य द्या, असे आदेश पोलिस यंत्रणेला दिले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT