Vehicles seized in Ichalkaranji will be returned from twenty 
कोल्हापूर

इचलकरंजीत 12 मे पासून जप्त वाहने परत मिळणार...

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी - लॉक डाऊनच्या कालावधीत पोलीसांनी ताब्यात घेतलेली सुमारे पाच हजार वाहने 12 ते 21 मे या कालावधीत परत देण्यात येणार आहेत. कागदपत्रांची पूतर्ता केल्यानंतर किमान दंडात्मक कारवाई करुन वाहने ताब्यात दिली जाणार आहेत. याबाबतची माहिती पोलीस उप अधिक्षक गणेश बिरादार यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉक डाऊनच्या कालावधीत रस्त्यावर नाहक फिरणारी वाहने पोलिसांनी जप्त केली होती. याची संख्या सुमारे पाच हजाराच्या पुढे आहे. शहर वाहतूक शाखा, गावभाग पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाणे, शहापूर पोलीस ठाणे या ठिकाणी जप्त करुन ठेवण्यात आली आहेत. ही वाहन परत देण्याबाबत कोल्हापूर पॅटर्न येथेही राबविण्यात येत आहे.
वाहने परत करतांना गर्दी टाळण्यासाठी दिवसभरात दोन सत्रात यामध्ये सकाळी 8 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सांयकाळी 7 यावेळेत वाहने परत दिली जाणार आहेत. 12 मे पासून 21 मे या कालावधीत ही वाहने परत देण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. मात्र वाहने परत देतांना दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
यामध्ये नियमानुसार 200 रुपये दंड व 100 रुपये क्रेन भाडे या प्रमाणे किमान 300 रुपयांची आकारणी केली जाणार आहे. मात्र त्यासाठी अर्जासोबत वैयक्तीक हमीपत्रासह आरसी बुक, आधार कार्ड, चालक परवाना, विमा या कागदपत्रांची झेरॉक्स पत्र जोडणे आवश्यक आहे. चारही ठिकाणांहून वाहने परत दिली जाणार आहेत.

दुकानदारी सुरु : कारवाईचे आदेश

वाहने परत करतांना लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता करुन देण्याचे सांगत कांहीजणांनी शहरात दुकानदारी सुरु केली. यामध्ये 100 रुपयांचा स्टॅम्पची गरज नसतांनाही दिशाभूल करण्यात आली आहे. याबाबत तक्रारी झाल्यानंतर संबंधितांवर कारवाईचे आदेश पोलीस उप अधिक्षक बिरादार यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha OBC Benefits : शासन आदेश! मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती, मृत आंदोलकांच्या मुलांना नोकरी मिळणार; मनोज जरांगेंची माहिती

Pune Water Crisis: पाण्यासाठी महिलांचा संताप अनावर! भीमनगरमध्ये रास्ता रोको; प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

Virat Kolhi Injury Update: विराट इंग्लंड दौऱ्यावर खेळणार का? दुखापतीमुळे झालाय संघाबाहेर, समोर आले नवीन अपडेट्स

Tajmahal Art: संगमरवरावर कोरलेला इतिहास! शाहजहानच्या काळातील आग्र्याची कला आता पोहोचली जगाच्या बाजारात

Pune News: रुग्णालयांचा मेडिकल कचरा नेमका जातो कुठे? कात्रज घाटातील प्रकाराने उघड झाले धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT