The Vice-Chancellor is facing a mountain of challenges 
कोल्हापूर

कुलगुरूंसमोर आहे आव्हनांचा डोंगर

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाचे नॅक परीक्षण, अंतिम वर्षांच्या परीक्षा यांबरोबर संशोधनातील गतीसह अन्य आव्हाने नूतन कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासमोर आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक प्रश्‍न सोडवणे व नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हेदेखील आव्हानात्मक काम असणार आहे.

13 वे कुलगुरू म्हणून डॉ. शिर्के यांनी नुकतीच निवड झाली. विद्यापीठात तीस वर्षांपेक्षा अधिक काळ काम केल्याने त्यांना विद्यापीठाची सर्वतोपरी माहिती आहे. असे असले तरी आतापर्यंत झालेल्या कुलगुरूंच्या तुलनेत डॉ. शिर्के यांच्यासमोरील आव्हाने मोठी आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच शिर्के यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा नियोजनाच्या बैठका घ्याव्या लागल्या.

नॅक परीक्षण 
नॅक मूल्यांकन पद्धत बदलल्यानंतरचे हे पहिलेच मूल्यांकन विद्यापीठात होईल. यासाठी 2014-15 पासून तयारी सुरू आहे. 70 टक्के मूल्यांकन संख्यात्मक तर 30 टक्के मूल्यांकन गुणात्मक आहे. स्टार्ट अपचे सरकारी प्रमाणपत्र मिळवणे, रिक्त पदे भरणे आणि त्यासाठी विद्यापीठाच्या फंडातून आर्थिक तरतूद करणे हेदेखील अवघड आहे. ही पदे रिक्त असल्यास त्याचा विपरित परिणाम मूल्यांकनावर होणार आहे. परीक्षा नियंत्रक व क्रीडा संचालक ही पदे रिक्त आहेत. नॅक तयारीसाठी असणाऱ्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. बी. एस. पाटील यांनी नुकताच राजीनामा दिला. त्या ठिकाणी नव्या संचालकांची तत्काळ नेमणूक गरजेचे आहे.

संशोधन व पेटंट 
कोरोनानंतर संशोधनासाठी निधी देणेही कठीण आहे. माणिकराव साळोखे यांच्या काळात संशोधन प्रकल्पाचा आराखडा बनवण्यासाठी फंडातून तरतूद केली होती. सध्या ती मिळत नाही. प्राध्यापकांनी पेटंट घेतले आहेत; पण त्यांची संख्या पुरेशी नसल्याचे सांगितले जाते. पेटंट मिळवण्यासाठीच्या कार्यशाळा घेणे, पेटंटची संख्या वाढीसाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिकारी, प्राध्यापकांत समन्वय 
प्रशासकीय अधिकारी आणि प्राध्यापकांत गटातटाचे राजकारण चालते. याचा परिणाम कामकाजावर होतो. त्यांच्या राजकारणातून कॅम्पसमध्ये उपद्रवमूल्य असणाऱ्या संघटनांही सक्रिय असून, त्यांचा त्रास प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना होतो. त्यांचा बंदोबस्त करणेही आवश्‍यक आहे. याशिवाय संशोधनासाठी सिंगल विंडो व्यवस्था, प्लेसमेंटसाठी सॉफ्ट स्कील डेव्हलपमेंट कार्यशाळा घेणे हेदेखील करणे आवश्‍यक आहे.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Kolhapur Dussehra : कोल्हापूरसाठी 'हा' कसला मानाचा तुरा, म्हणे राज्याचा प्रमुख महोत्सव; शाही दसऱ्यासाठी निधीच नाही

World Wrestling Championship 2025 : भारताच्या सुजीतची कडवी झुंज अपयशी, ऑलिंपिक विजेत्या रहमानचा ६-५ने विजय

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

SCROLL FOR NEXT