video viral on kolhapur rankala 
कोल्हापूर

Video - बंबात जाळ अन्‌ कोल्हापूरचा विषयच हार्ड; या भावाच्या व्हिडिओने लावलंय सगळ्यांनाच याड 

धनाजी सुर्वे

कोल्हापूर - कोल्हापूर म्हटलं की इथं प्रत्येक विषय हार्डच असतो. त्यामुळंच कोल्हापूरला जगात भारी कोल्हापुरी असं म्हटलं जातं. कोल्हापूर म्हटलं की तांबडा-पांढरा रस्सा, दूध कट्टा, राजाभाऊंची भेळ, डोळ्यातणं पाणी आणणारी झणझणीत मिसळ, कोल्हापुरी चप्पल असं येथील सगळंच प्रसिद्ध आहे. यासोबतच प्रसिद्ध आहे ती येथील रांगड्या लोकांची कोल्हापुरी भाषा. या भाषेतील गोडवा थेट समोर बसणाऱ्याच्या काळजात घुसतो. कोल्हापूरकर आपल्या भाषेवर जीवापाड प्रेम करतात. याच भाषेवर अतोनात प्रेम करणाऱ्या एका आरजेने (रेडिओ निवेदक) येथील रंकाळ्याची माहिती सांगणारा एका व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातलाय. मंगोलियन इंग्लिशमधून माहिती सांगताना या आरजेच्या बोलण्यातील रांगडेपणाला नेटीझन्सनी अक्षरक्ष: डोक्‍यावर घेतलं आहे. 

मूळचा कोल्हापूरचा सुमित मोगले सध्या औरंगाबादमध्ये आरजे म्हणून काम करतो. कामानिमित्त बाहेर राहावं लागत असलं तरी सुमितला कोल्हापूरची आठवण मात्र रोज सतावत असते. त्यामुळंच तो आपल्या मूळ भाषेत असे विनोदी व्हिडिओ बनवत असतो. नुकताच त्याने येथील रंकाळ्याची माहिती सांगणारा एक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओबाबत अधिक जाणून घेण्यासाठी सुमितशी संवाद साधला. त्यावेळी सुमित सांगतो, "मी एकदा गावी मामांच्या शेतात गेलो होतो. तेथील शेत, शेतकरी, शेतातील हिरव्यागार पिकांसह तेथील साध्या भोळ्या माणसांवर सहजच एक व्हिडिओ करायचा म्हणून केला होता. त्यावेळी तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला. त्यानंतर बऱ्याच लोकांनी फोन करून कौतुक केलंच शिवाय यापुढेही असेच व्हिडिओ बनविण्याची विनंती केली. शिवाय मी नोकरीनिमित्त औरंगाबादमध्ये राहतो. त्यामुळे मी माझ्या भाषेला मिस करतो. बाहेरगावी राहत असलो तरी मातीशी आणि भाषेशी माझी नाळ घट्ट जोडलेली आहेच. माझ्या भाषेचा विसर पडू नये म्हणून मी फेसबुकवर असे व्हिडिओ करत आहे. त्यासोबतच कोल्हापुरात आल्यानंतर मी माझ्या आवडत्या ठिकाणी जातो आणि असे मनोरंजनात्मक व्हिडिओ बनवत असतो. रंकाळा हा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सुट्टीसाठी कोल्हापुरात आल्यानंतर मी न चुकता रंकाळ्यावर जातो. परवा असचा फेरफटका मारण्यासाठी रंकाळ्यावर गेल्यानतर हा व्हिडिओ बनविला आहे. हा व्हिडिओ पाहून बाहेर देशात राहणाऱ्या काही मराठी माणसांचे फोन आले. हे लोक या व्हिडिओची मजा घेत आहेत.' 

कोल्हापूर म्हटलं की रंकाळा 

कोल्हापूरचे वैभव म्हणून या रंकाळ्याची ओळख आहे. कोल्हापुरात आल्यानंतर रंकाळ्यावर न जाता परत गेला आहे, असे कधीच होत नाही. महालक्ष्मीचे दर्शन घेतले की पावले आपोआप रंकाळ्याकडे वळतात. रंकाळा हा कोल्हापूरकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. 

कोल्हापूर हे शहर चित्रीकरणातील प्रसिद्ध शहर आहे. अनेक मराठी, हिंदी चित्रपट कोल्हापुरातील चित्रगृहांमध्ये तयार झाले आहेत. रंकाळा तलावाजवळ शांतकिरण चित्रगृहामध्ये बरेचसे चित्रपट चित्रित झाले आहेत. काळ्या दगडांपासून बनलेल्या इतिहासातील काही घटनांची साक्ष देणारा हा तलाव आहे. 

कोल्हापूरचा "मरीन ड्राईव्ह' 
रंकाळ्याचा उल्लेख कोल्हापूरचा "मरीन ड्राईव्ह' असा केला जातो. रंकाळा चौपाटी हे करवीरवासीयांचे एक अत्यंत आवडते ठिकाण असून, सायंकाळच्या आल्हाददायक वातावरणात ही चौपाटी पर्यटकांनी व नागरिकांनी गजबजलेली असते. रंकाळ्यात बोटिंग, लहान मुलांना खेळण्यासाठी बाग, घोडसवारी, खाद्यपदार्थांचे स्टॉल यात पर्यटक हरवून जातात. 

या रंकाळ्याकाठी शालिनी राजवाडा असून, राजवाड्याच्या भव्यतेमुळे रंकाळ्याच्या वैभवात अधिकच भर पडली आहे. पूर्व बाजूला आणि थोड्याफार अंशी तलावात एक संध्यामठ आहे. हा मठ म्हणजे प्रशस्त मंडप असून, त्याची बांधणी हेमांडपंथी पद्धतीने केली आहे. रंकाळ्याजवळ पद्माराजे उद्यान आहे. एकेकाळी कोल्हापूरच्या राजांना तलावामध्ये विहार करणे सुलभ व्हावे म्हणून छोट्याछोट्या नावांची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे या तलावामध्ये मासे पकडण्याचा हक्‍क फक्‍त राजांचा होता. आता तलावात विहार करण्यासाठी महानगरपालिकेने सोय केली आहे. 

व्हिडिओ पाहा 

धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi preparing sweets Video : राहुल गांधींनी तळली इमरती अन् बनवले बेसनाचे लाडू ; दुकानदार म्हणाला ‘’आता फक्त..’’

'जयाने जर पांढरी साडी घातली...', अमिताभ बच्चन यांच्या आई निर्मात्याला म्हणाल्या.... 'तुझं जगणं...'

Diwali Offer : १०० रुपयांचा रिचार्ज करा अन् Silver Coin जिंका, 'या कंपनीची भन्नाट ऑफर, आज शेवटचा दिवस...

Pune Cyber Crime : पुण्यात सायबर गुन्ह्यांची वाढ; ज्येष्ठ नागरिकांची बचत धोक्यात! बँक आणि पोलिसांनी समन्वय साधावा, तज्ज्ञांचा सल्ला

Latest Marathi News Live Update : जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ आमने-सामने

SCROLL FOR NEXT