village level also treatment on cancer in kolhapur 
कोल्हापूर

Good News : आता ग्रामीण भागातही होणार कर्करोगाचे निदान

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यात कर्करोगाचे वाढते प्रमाण आटोक्‍यात आणण्यासाठी राज्य शासनातर्फे राज्यातील १५० हून अधिक ग्रामीण शासकीय रुग्णालयांत कर्करोग निदान सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटींची तरतूद केली आहे, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली, मात्र उपचार सेवेसाठी लागणाऱ्या कर्करोग तज्ज्ञांची संख्याच कमी असल्याने या सुविधेला तूर्त विलंब होण्याची शक्‍यताही वर्तवली. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशभरात साडेबारा लाख नवे कर्क रुग्ण आढळून आले आहेत. आठ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ५ लाख रुग्ण उपचारार्थ आहेत. यात महाराष्ट्रात कर्करोगाचे प्रमाण लक्षवेधी आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. अनेकजण स्वतःहून कर्करोगाची तपासणी करत नाहीत. यातून अनेकांना कर्करोगाचे अंतिम टप्प्यातच निदान होते. तेव्हा उपचार करणेही अशक्‍य होते. अशातून कर्करुग्णांची संख्या व मृत्यू वाढत आहेत. हीच बाब विचारात घेऊन राज्य शासनाने ग्रामीण रुग्णालयात कर्करोग निदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

यात कर्करोगाचे वेळीच निदान होईल, प्राथमिक अवस्थेत असलेला कर्करोग शस्त्रक्रिया किंवा पूरक उपचाराने बरा होण्याचे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मिशन, ब्रेस्ट पोब, बायोस्पी अशा सुविधा देण्यात येतील. कर्करोग तज्ज्ञांची संख्याही वाढवावी लागणार आहे. त्यासाठी किमान २०० हून अधिक कर्करोग तज्ज्ञांची सेवा घ्यावी लागणार, तर इतक्‍या डॉक्‍टरांची उपलब्धता होणे मुश्‍कील आहे. त्यामुळे खासगी कर्करोग तज्ज्ञांच्या साहाय्यानेही कर्करोग निदान सेवा बजावली जावी, यासाठी शासनस्तरावर विचारविनिमय सुरू आहे.   

१२ ग्रामीण रुग्णालयांत सेवा

जिल्ह्यातही जवळपास वर्षभरात सहा हजारांवर कर्करुग्णांची तपासणी व उपचार झाले आहेत. २२ खासगी हॉस्पिटलमध्ये कर्करोग निदान व उपचार सेवा आहे. याशिवाय जिल्हा शासकीय रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात कर्करोग निदान होते. नव्या योजनेनुसार किमान १२ ग्रामीण रुग्णालयांतही निदान उपचार सेवा सुरू होण्यास मदत होईल.

संंपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : जेद्दाहहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईट ६ई ६८ ला सुरक्षेचा धोका

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT