village level festival cancelled but sheeps selling increase in kolhapur 
कोल्हापूर

होऊ दे खर्च! यात्रा रद्द तरीही बकऱ्यांची उलाढाल 50 लाखांची

सकाळ वृत्तसेवा

सेनापती कापशी (कोल्हापूर) : कोरोनामुळे चिकोत्रा खोऱ्यातील ग्रामदेवतांच्या यात्रा बंद असे पाच गावच्या समित्यांनी जाहीर केले; मात्र येथील आठवडी बाजारात निव्वळ बकऱ्यांची ५० लाखांची उलाढाल झाली. साडेचारशे लहान मोठ्या बोकड, बकऱ्यांची विक्री झाली. मग खरंच यात्रा बंद आहेत का? असा प्रश्न पडतो. गेल्या वर्षीपेक्षा केवळ पाच लाखाने ही रक्कम कमी आहे.

परिसरातील २० गावांतील यात्रांचा हंगाम दोन महिने चालतो. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या प्रत्येक बाजारातील उलाढाल वाढते. प्रत्येक सोमवारी भाजीपाला, मसाले, तेल, कडधान्ये आणि इतर असा सुमारे २० लाखांचा व्यापार होतो. नेहमीचे व्यापारी, दुकानदार यांचा व्यापार आठवडाभर सुरूच असतो; मात्र आठवड्यातून एकदा ग्रामपंचायत पावती घेऊन लहान सहान व्यापार करणारे ३०० विक्रेते येतात. 

२० गावांसाठी ही आठवडी बाजारपेठ असल्याने व्यापारी आणि भाजीपाला, फळ विक्रेते शेतकरी असतात. परिसरातील ग्रामदेवतेच्या यात्रा या मांसाहारी असल्याने या दोन महिन्यांच्या काळात मांसासाठी मेंढरे आणि बोकड, कोंबड्या आणि त्याच्यासाठी लागणारे, तेल, मसाले आणि इतर बाजारात मोठी वाढ होते. या वर्षी कोरोनामुळे यात्रा बंद असाच सर्वत्र संदेश होता. मात्र आज जुन्या एसटी स्टॅंडजवळ बकऱ्यांचे विक्रेते आणि ग्राहक यांची प्रचंड गर्दी होती. 

७ पासून २५ हजारांपर्यत बकऱ्यांची विक्री 

गेल्यावर्षीपेक्षा दरातही मोठी वाढ झाली आहे. ७ हजारांपासून २५ हजारांपर्यंत बकऱ्यांची विक्री झाली.  भुदरगड तालुक्‍यातील नांगरगावपासून आजरा आणि कागल तालुक्‍यातील सीमेवरील गावातून विक्रेते आले होते. कोरोनामुळे यात्रा करू नयेत अशीच भूमिका प्रत्येक गावच्या प्रशासनाची आहे. काही गावांनी यात्रा करणाऱ्यांना स्थानिक पातळीवर दंडही ठेवला आहे.
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi : साई बाबांच्या नगरीत हे काय सुरुय? संस्थानच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत मोठी खळबळ, धक्कादायक कारण समोर, पाहा VIDEO

Suryakumar Yadav: '... तर मला भारताच्या वनडे संघाचंही कर्णधारपद मिळालं असतं', सूर्यकुमार नेमकं काय म्हणाला? वाचा

Latest Marathi News Live Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

दिवाळी गिफ्ट काय द्यावं हेसुद्धा कळेना! पंढरपूर विठ्ठल मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला चिकन मसाला, BVG कंपनीचा अजब कारभार

Pune - Nashik हायवेवर 'ट्राफिक जाम'ची दिवाळी! प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT