चंदगड - अडकूर ( ता. चंदगड ) येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली. मृत स्थानिक रहीवाशी होता. ग्रामस्थांत उठबैस असल्याने संपर्काची मोठी साखळी आहे. त्यामुळे अनेकांना ह 
कोल्हापूर

चंदगड तालुक्यातील अडकूर येथील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने ग्रामस्थ हादरले...

सकाळवृत्तसेवा

चंदगड - अडकूर ( ता. चंदगड ) येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली. मृत स्थानिक रहीवाशी होता. ग्रामस्थांत उठबैस असल्याने संपर्काची मोठी साखळी आहे. त्यामुळे अनेकांना हादरा बसला आहे. आरोग्य यंत्रणा त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहीती घेत आहे.

संबंधीत मृत व्यक्तीचे बसस्थानक परिसरात घर आहे. दिड महिन्यापूर्वी त्याची आई पुण्याहून आली होती. ती आजारी असल्याचे समजते. दरम्यान मृताला चार दिवसापूर्वी पर्यंत कोणतेही लक्षण नव्हते. बसस्थानक परिसरात त्याचा वावर होता. अनेकजण त्याच्या थेट संपर्कात होते. चार दिवसापूर्वी त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्याला गडहिंग्लजला नेण्यात आले. तिथून सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. आज उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले. आत्तापर्यंत सापडलेले रुग्ण शहरातून आले होते.  मृत नागरीक स्थानिक रहिवाशी असल्याने संसर्गाच्या बाबतीत अजूनही नागरीकांनी खबरदारी घेण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

आरोग्य विभागाने मृताच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यास सुरवात केली असून अती संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन केले जाणार आहे. मृताच्या कुटुंबात आई, पत्नी व मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT