Vinay Sahastrabuddhe said, Chandgad will Try To Set Up A Cashew Board Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

चंदगडला काजू बोर्ड स्थापण्यासाठी प्रयत्न : विनय सहस्त्रबुध्दे

सुनील कोंडुसकर

चंदगड : देशात काजू उत्पादनामध्ये चंदगड, आजरा विभाग अग्रेसर आहे. कोकण आणि घाटमध्यावर मध्यवर्ती चंदगड तालुक्‍यात काजू बोर्ड स्थापन झाल्यास या पिकाच्या माध्यमातून संशोधन, उत्पादन आणि प्रक्रीया उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याही ग्वाही राज्यसभा खासदार व भाजपचे माजी उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे यांनी दिली. 

तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव वांद्रे विद्या संकुलमध्ये व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. "शेती व काजू प्रक्रीया' या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. 
मोहन परब यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तालुक्‍यात काजू उत्पादनाला असलेला वाव, प्रक्रीया उद्योग आणि सद्यस्थिती या विषयी त्यांनी माहिती दिली. केंद्र शासनाने लागू केलेले शेतकरी धोरणाविषयी महादेव वांद्रे यांनी प्रश्‍न उपस्थित केला.

त्यावर हे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. कॉन्ट्रॅक्‍ट पध्दतीमुळे शेतकऱ्यांची मालकी अबाधित राहिल. त्यांना चांगले पैसे मिळतील. शिवाय हे धोरण पूर्वीचेच आहे. त्याची अंमलबजावणी भाजपच्या कालावधीत होत असल्याचे सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले. शेतीची पारंपरिक पध्दती सोडून नव्या तंत्रज्ञानाच्या आणि नियोजनाच्या दिशेने प्रयत्न केले तरच ती किफायतशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने उपलब्ध जमिनीतून दुप्पट, तिप्पट उत्पन्न कसे घेता येईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तालुक्‍यात फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून चाललेल्या प्रयोगाचे त्यांनी कौतुक केले. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील, महादेव वांद्रे, भूषण नाईक, तुकाराम बेनके, उदयकुमार देशपांडे यांनी सहस्त्रबुध्दे यांना प्रश्‍न विचारले. त्याची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष गावडे व ढेकोळीचे सरपंच नरसिंगराव पाटील यांनी संयोजन केले. 

काजू फळ प्रक्रीयेबाबत बैठक 
काजू बी वर प्रक्रीया होत असली तरी फळ मात्र कुजून जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र शासनाकडून फळ प्रक्रीयेला परवानगी नसल्यामुळे कोट्यवधी रूपयांचे फळ वाया जात असल्याचे सांगितले. या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न करण्याचे आश्‍वासन सहस्त्रबुध्दे यांनी दिले. तालुक्‍यातील शिष्टमंडळासह वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेऊन हा प्रश्‍न हाताळण्याचे ठरले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya : मल्ल्याने म्हटलं बँकांनी जास्त पैसे वसूल केले, पण SBIच्या प्रतिज्ञापत्रात वेगळाच दावा; ८,७५२ कोटी बाकी, पुढे काय होणार?

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

CNG गॅस भरताना टाकीचा स्फोट, कारच्या चिंधड्या; इतर गाड्यांचेही नुकसान, घटनेचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT