Violation Of Rules By Home Quarantine Petient In Jaysingpur Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या चारशेपार, तरीही होम क्वारंटाईन लोक फिरतोहच खुलेआम

गणेश शिंदे

जयसिंगपूर : शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या चारशेपार झाली आहे. प्रशासनाकडून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्या नागरिकांच्या प्रतिसादावर अवलंबून असताना होम क्वारंटाईन व्यक्ती सध्या खुलेआम फिरत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या शिरोळ तालुक्‍यात सर्वाधिक आहे. तालुक्‍यातील जवळपास चाळीसहून अधिक गावांचा संपर्क शहराशी आहे. आरोग्याच्या दृष्टिने सोयीचे शहर म्हणूनही जयसिंगपूरकडे पाहिले जाते. मात्र, सध्या कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपालिका प्रशासनाने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शहराच्या गल्लीबोळात रुग्ण आढळत असताना प्रशासनाकडून रुग्ण आढळलेल्या कुटुंबातील अन्य सदस्यांचे स्वॅब घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.

मात्र, होम क्वारंटाईन लोकांचा शहरात वावर वाढल्याने प्रशासनाच्या आवाहनाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे रुग्ण आढळलेल्या आणि होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींच्या मुक्त वावरामुळे शेजाऱ्यांबरोबर वादाचेही प्रसंग उद्‌भवत आहेत. 

होम क्वारंटाईन लोक बाहेर फिरतातच कसे, असा प्रश्‍न प्रशासनाला नागरिक विचारत असताना आता प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरावर लक्ष ठेवावे का, असाही मुद्दा उपस्थित झाला आहे. नागरिकांनीच शहराची सुरक्षितता राखण्याची वेळ असताना होम क्वारंटाईन व्यक्तींनी बाहेर न फिरता प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी नागरिकांच्या सहकार्याशिवाय उपाययोजना होऊच शकत नसल्याने नागरिकांच्या जीवावरच शहराचे आरोग्य अवलंबून आहे. 

...अन्यथा, कारवाई करावी लागेल
शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोनावर नियंत्रण राखणे शक्‍य नाही. त्यामुळे होम क्वारंटाईन व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा, प्रशासनाच्या मदतीने कारवाई करावी लागेल. 

- दत्तात्रय बोरिगिड्डे, पोलिस निरीक्षक, जयसिंगपूर पोलिस ठाणे 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT