viral video of chair girl in kolhapur sugar cane factory for celebration 
कोल्हापूर

मैदानावरील चिअर गर्ल्स ट्रॅक्टरवर; ऊस वाहतुकदारांचा नुसता राडा

साईनाथ पाटील

हळदी (कोल्हापूर) : करवीर तालक्यातील एका साखर कारखान्याच्या ऊस तोडणीचा काल समारोप झाला. यामध्ये कारखाना परिसरातील काही ट्रॅक्टर चालकांनी या समारोपाच्या मिरवणुकीमध्ये चक्क डॉल्बीच्या तालावरती नृत्यांगना (चिअर गर्ल्स) नाचवत, मिरवणूक काढून समारोपा केला. या संबधित सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

दरम्यामन कोल्हापूर - राधानगरी राज्यमार्गावर सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते पण या वाहतुकीचा कुठलाही विचार न करता, मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी नसताना देखील अशा पद्धतीने केलेला हा प्रकार पूर्णता निंदनीय असल्याची भावना सर्वसामान्यांनी व्यक्त केली. सायंकाळी पाचच्या सुमारास  सुरू झालेली मिरवणूक तब्बल दोन तासांनी हळदीच्या मुख्य बस थांब्यावर आली. त्याठिकाणी मुख्य रस्त्यातच ट्रॅक्टर लावून डॉल्बीच्या मागे असणाऱ्या ट्रॉलीमध्ये दोन नृत्यांगना हावभाव करत नृत्य करत होत्या. तर दारूच्या नशेत असलेले अनेक ऊसतोड कामगार, ट्रॅकर चालक व युवक त्या ट्रॉलीमागे नाचत होते. हे पाहण्यासाठी अनेकजण रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबले होते. राज्यमार्ग रहदारीचा रस्ता असल्याने या प्रकारामुळे दीर्घकाळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या सगळ्या प्रकारावेळी कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हता. तसेच कुणीही सामाजिक अंतराचा नियम पाळला नव्हता. यावेळी सोबतचे काही ट्रॅक्टरचालक जल्लोषात ट्रॅक्टरला उसाने भरलेल्या ट्रॉली जोडल्या असतानाही मुख्य मार्गावरती मागील दोन चाकावर ट्रॅक्टर उचलून स्टंटबाजी करत होते.

परिसरातील नागरिकांनी तात्काळ करवीर पोलिस ठाण्याला संबंधित घटना कळवली पण पोलीस विभागाचे लोक येईपर्यंत सर्वांनी धूम ठोकली. कोरोनाच्या महामारी मध्ये सर्वसामान्यांना कडक निर्बंध असतानादेखील असा प्रकार झाला आहे. हा सगळा प्रकार अनेकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी त्यांचे खबरे, संबंधित गावातील पोलिस पाटील व मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ शूटिंगच्या आधारे संबंधितावर कारवाई करावी अशी अपेक्षा आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT