vishwajeet kadam minister sangli 
कोल्हापूर

विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसचेच, चर्चेचा प्रश्‍नच नाही ; डॉ. विश्‍वजित कदम 

रवींद्र साळवी

सांगली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना जी चर्चा झाली, त्यानुसार विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसला मिळालेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा चर्चा करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. तरीही कुणाचे यावर काही म्हणणे असेल तर कॉंग्रेसचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी निश्‍चित ऐकून घेतील असे मत कॉंग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी येथे बोलताना व्यक्त केले. 


सांगलीत आज गॅस, डिझेल आणि पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनात मंत्री डॉ. विश्‍वजित कदम सहभागी झाले होते. आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना, विधानसभेचे अध्यक्ष कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपद खुले झाल्याची टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली होती. तर या पदावर शिवसेनेच्या आमदाराची वर्णी लागेल अशी चर्चा सुरु आहे, यावर कॉंग्रेस नेते मंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

ते म्हणाले, नाना पटोले यांनी पक्षाच्या श्रेष्ठींच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे अध्यक्षपद रिकामे असले, तरी महाविकास आघाडीची चर्चा सुरु असताना आणि सरकार स्थापन होताना हे पद कॉंग्रेसला मिळालेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा चर्चा करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. पण, निश्‍चित स्वरुपात याबद्दल कुणाचे काही म्हणणे असतील तर आमचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी त्यांचे म्हणणे ऐकून घेतील.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Motors: टाटा मोटर्सचा शेअर 40 टक्क्यांनी घसरला; शेअर बाजारात नेमकं काय घडलं?

Kolhapur Youth Accident : आयुष्याचा शेवट एका स्पीड ब्रेकरमुळे झाला, २४ सत्यजित बाबतीत घडलं विपरीत

Nashik Crime : भद्रकाली पोलिसांची मोठी कारवाई! १८ गुन्हे दाखल असलेल्या तडीपार सागर कुमावतला वणी गडावरून घेतले ताब्यात

टीआरपीसाठी कलर्स मराठीची नवी शक्कल; भेटीला येतोय नवीन कार्यक्रम, दिसणार एकापेक्षा एक भारी अभिनेत्री, नाव वाचलंत का?

माओवादी चळवळीला मोठा धक्का! वरिष्ठ नेता भूपती मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवत पत्करणार शरणागती

SCROLL FOR NEXT