Visually impaired man harvesting sugarcane kolhapur marathi news 
कोल्हापूर

व्हिडिओ : डोळे गेले पण ऊस तोडणी करत अंकुशने कमवले २१ लाख रुपये....

कुंडलिक पाटील

सांगरूळ (कोल्हापूर) - शेती पिकत नाही, शेतीमालाला दर नाही, घर बांधले, कर्ज झाले, हात पाय डोळे धडधाकट असताना कामधंदा करण्याऐवजी आता आत्महत्या करू का ? असे चित्र शेतकरी तरुणांच्यात दिसते. याउलट अंध असूनही तब्बल चौदा वर्षे ऊस तोडणी मजूर म्हणून काम करून सुमारे २१ लाख रुपये मिळवले आहेत. दृष्टी नसताना अंकुशच्या या कामाला सलाम करावा लागेल. 

अनोख्या जिद्दीला सलाम

शरीर, डोळे , हातपाय धडधाकट असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना अंकुशने जगण्याचा मंत्र दिला आहे.खुपिरे (ता. करवीर) येथील ही एका तरुण शेतकऱ्याच्या जिद्दीची ही कहाणी आहे. अंकुश भिकाजी पाटील (वय ३९) असे त्याचे नाव आहे. दहावीचे शिक्षण १९९७ ला झाल्यानंतर वडिलांचा ऊस तोडणी व्यवसाय अंकुशने पत्करला. 

अपघात घडला अन् अंकुशची डोळे गेले

शर्यतीत घोडागाडी पळवण्याचाही त्याचा छंद होता. २००५ ला घोड्यांच्या स्पर्धेत मोटारसायकल घसरली आणि अंकुश डोक्‍याला जबर मार बसला. यात डोळ्यांच्या नसा निकामी झाल्याने दिसायचे कमी आले. दोन वर्षे मुंबई, हैदराबादपर्यंत उपचार घेतले, मात्र २००७ ला अंकुशचे दोन्ही डोळे शंभर टक्के दृिष्टहीन झाले. डोळे गेल्यामुळे लग्न होणार नाही, घर बांधणीसाठी साडेसहा लाख कर्ज काढलेले, ते कसे फेडायचे, कामधंदा करता येणार नाही, अशी परिस्थिती अंकुशसमोर उभी होती. अशावेळी जिद्दीने अंकुश वडिलांबरोबर ऊस तोडणीसाठी फडात जाऊ लागला. डोळ्यांना दिसत नाही, घरातून बाहेर पडल्यानंतर ठेचकाळत काम करताना शेजारचे पांडुरंग पाटील हे त्याचे आधार बनले. अंकुशबरोबर ते ऊस तोडणीस जाऊ लागले. पहाटे अंकुश बैलगाडी जुंपतो, पुढे पांडुरंग यांच्या खांद्याचा आधार घेत फड गाठतो, तोडलेला ऊस रोज दीडशे ते दोनशें मोळ्या, वाडे, वैरण बांधतो, अशी कामे तो १४ वर्षे करत आहे. 

३०० फोन नंबर तोंडपाठ

अंकुशला दृष्टी नसली तरी आवाजावर तो नावाने व्यक्ती ओळखतो. ३०० फोन नंबर त्याला तोंडपाठ आहेत. हा माझा छंद आहे, असे तो म्हणतो.

मी धडधाकट आहे, अपघातानेच माझ दृष्टी गेली आहे. तरीही मी बसुन राहत नाही. आता ऐन उमेदीत काम करतो पण भविष्यात मला शासनाकडून अंध पेन्शन मिळावी हीच अपेक्षा.
- अंकुश पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Minister Resignations: मेघालयमध्ये राजकीय हालचालींना वेग; 12 पैकी आठ मंत्र्यांचे राजीनामे; जाणून घ्या, नेमकं कारण?

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Latest Marathi News Updates : आयुष कोमकर हत्या प्रकरण : कृष्णा आंदेकर २ दिवस पोलीस कोठडीत

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

SCROLL FOR NEXT