Waiting for the ambulance, the autopsy 
कोल्हापूर

रुग्णवाहिका, शववाहिकेसाठी आता वेटिंग 

डॅनियल काळे

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वर्कशॉपला आता नव्या वाहनांची गरज आहे. केंद्र सरकारने 20 वर्षापूर्वीची वाहने वापरण्यावर निर्बंध आणल्याने अनेक वाहने आता भंगारात जाणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक सोयी आणि सुविधांवर त्याचा ताण पडणार आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याबाबतीत लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा सार्वजनिक सोयी, सुविधांचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. 

कोल्हापूर महापालिकेचे वर्कशॉप सुभाषनगर येथे आहे. या वर्कशॉपमध्ये दीडशेहून अधिक वाहने आहेत. यात कचरा उठाव करणारी आरसी वाहने, डंपर,ट्रक, शववाहिका, रुग्णवाहिका, डॉग व्हॅन, अग्निशमन दलाची वाहने, मैला सक्‍शन गाडी अशी वाहने ही जुनी झाली आहेत. 

अनेक वाहने नादुरुस्त आहेत. तात्पुरती दुरुस्ती करुन या वाहनांचा उपयोग केला जात आहे. वर्कशॉपमधील कर्मचारी, तंत्रज्ञ ही वाहने वर्कशॉपमध्येच दुरूस्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कशी बशी ही वाहने सेवेसाठी रस्त्यावर धावतात. 

महापालिकेकडे पाच रुग्णवाहिका आहेत. यापैकी 3 रुग्णवाहिका 20 वर्षापूर्वीच्या आहेत. दोनच रुग्णवाहिका वापरात येणार आहेत. नव्या तीन रुग्णवाहिकेची गरज भासणार आहे. शववाहिकांचीही स्थिती अशीच आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या ताफ्यात 5 शववाहिका आहेत. यापैकी वीस वर्षापूर्वीच्या तीन तर अन्य दोन त्यांनंतरच्या आहेत. त्यामुळे शववाहिका दोनच वापरात येणार आहे. शहर आणि शहराचा विस्तार पाहिला तर रुग्णवाहिका आणि शववाहिकाही कमी पडतात. दररोज मोठ्या प्रमाणात मागणी असते. ही वाहने जर लवकर खरेदी केली नाही तर मात्र या सुविधेवर मोठ्या प्रमाणात ताण पडणार आहेत. अतिक्रमण निर्मूलन पथकाचा ट्रक, मैला सक्‍शक वाहने, डंपर अनेक वाहने 20 वर्षापूर्वीची आहेत. महापालकेच्या वर्कशॉपचा चेहरामोहराच बदलावा लागणार आहे. 
 

मिळणाऱ्या वाहनांची प्रतिक्षा 
महापालिकेला काही लोकप्रतिनिधीनी रुग्णवाहिका आणि शववाहिका भेट देण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र महापालिकेच्या ताफ्यात ही वाहने आलेली नाहीत. लोकप्रतिनिधीनीही तातडीने ही वाहने द्यायला हवीत. अन्यथा भविष्यात सार्वजनिक सोयी, सुविधांवर मोठा ताण पडण्याची शक्‍यता आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरात पुतळ्यावरुन तणावाचे वातावरण

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT