सोनाळी : येथे वरद पाटील या बालकाच्या शोकसभेवेळी उपस्थित ग्रामस्थ. sakal
कोल्हापूर

'वरद बाळा, ये रे परत.!'; वरदच्या फोटोपूजनवेळी आई-वडिलांची आर्त हाक

अपहरण करुन खून झालेल्या दुर्देवी वरद पाटील याचा फोटोपूजन विधी जड अंत:करणाने घरगुती स्वरुपात पार पडला.

दत्तात्रय वारके

बिद्री: येथील अपहरण करुन खून झालेल्या दुर्देवी वरद पाटील याचा फोटोपूजन विधी जड अंत:करणाने घरगुती स्वरुपात पार पडला. कालपरवापर्यंत घरात बागडणाऱ्या लाडक्या मुलाच्या फोटो पूजनाची वेळ त्याच्या आई-वडिलांवर आली. यावेळी 'वरद बाळा, ये रे परत .... ! ' म्हणत त्याच्या आईने फोडलेली आर्तहाक अनेकांच्या काळजाला चिरत गेल्याने उपस्थित ग्रामस्थही गहिवरले.

सायंकाळी नागनाथ देवालयामध्ये महिला व ग्रामस्थांनी शोकसभा घेऊन वरदला श्रद्धांजली वाहिली. यावेळी पाणावलेले डोळे, ह्रदयामध्ये क्रूर नराधामाने केलेल्या कृत्याची चीड, आरोपी नराधमांला फाशीची शिक्षा होण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार करत, जोपर्यंत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत ग्रामस्थांनी पाटील कुटुंबीयांच्या पाठीशी राहून त्यांना आधार देण्याचे अभिवचन दिले. याप्रसंगी अनेकांनी मनोगतातून आपला संताप व्यक्त केला.

सदर खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची याकामी नियुक्ती करावी व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या आशयाचे निवेदन सोनाळीतील तनिष्का महिला ग्रुप व महिला बचत गटांच्यावतीने मुरगुड पोलीस स्टेशनचे स्वप्नील मोरे व महिला कॉन्स्टेबल सरिता देवर्डेकर यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी सरपंच तानाजी कांबळे, उपसरपंच सुवर्णा भोसले, प्रमिला पोवार, सुरेखा पाटील, ललिता पाटील, माजी सरपंच सत्यजित पाटील, मुख्याध्यापक पी.व्ही. पाटील, मधुकर पाटील,संभाजी कुलकर्णी, साताप्पा सोनाळकर, रामचंद्र कपले,प्रविण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT