Ward composition of 429 gram panchayats in Kolhapur district will be decided today
Ward composition of 429 gram panchayats in Kolhapur district will be decided today 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतीची प्रभाग रचना आज ठरणार

लुमाकांत नलवडे


कोल्हापूर ः जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतीची नवीन प्रभाग रचनेवर आज जिल्हाधिकारी यांच्याकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. दोन नोव्हेंबरपासून या प्रभागरचनेसह इतर माहिती प्रत्येक तहसिल कार्यालयाच्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आज दिवसभर याबाबतचे काम निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार अर्चना कापसे आणि रंजना बिचकर यांनी पूर्ण केले आहे. 
कोरोना महामारीच्याकाळात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रीया राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली होती. नुकताच अनलॉक पाच झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ही प्रक्रीया पुन्हा सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातून हे कामकाज सुरू होते. श्री.गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसिलदार कापसे आणि बिचकर यांनी शाहू सभागृहात बसून याबाबतची सर्व प्रक्रीया पूर्ण केली आहे. तिघांच्या समोरही कागदांचे गठ्ठे होते. तिघांकडून प्रत्येक कागदाची शहानिशा करून त्याला अंतिम स्वरुप दिले जात होते. हे सर्व काम आज पूर्ण झाले असून उद्या शिक्कामोर्तब करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या समोर ठेवले जाणार आहे. जिल्हाधिरी दौलत देसाई यांची सही झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. दोन नोव्हेंबरला याबाबतची सविस्तर माहिती प्रत्येक तहसिल कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. याबाबत हरकती व इतर प्रक्रीया यापूर्वीच पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT