"Warkari" who writes various texts in his own handwriting 
कोल्हापूर

विविध ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहिणारा "वारकरी' 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : वय वाढेल तसा थकवा येतो. आरोग्याची काळजी घेत आयुष्य जगावं लागत. वाढत्या वयात करायचे काय, असा प्रश्‍न नक्कीच ज्येष्ठ नागरिकांना पडतो. "साठी बुद्धी नाठी,' असे म्हटले जात असले तरी साठी पार करूनही विविध क्षेत्रात चमकणारे पाहायला मिळतात. रामानंदनगरातील 81 वर्षीय विठ्ठल केशव बोभाटे यांना विविध ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहिण्याचा छंद आहे. आठ वर्षांपूर्वीच त्यांनी "ज्ञानेश्‍वरी' स्वहस्ताक्षरात लिहिली होती. त्यांची हातातील लेखणी आजही थांबलेली नाही.


बोभाटे मूळचे राशिवडेचे. नोकरीनिमित्त रामानंदनगरात स्थायिक आहेत. ते वारकरी आहेत. अनुलोम-विलोम, सूर्यनमस्कार, ध्यानधारणा हा त्यांचा सकाळी उठल्यावरचा उपक्रम. आरोग्य सुदृढ असायला हवे, असे ते आवर्जून सांगतात. त्यांनी रामस्तुती, मंदोदरी रावण संवाद, दासबोध निवडक वेचे, संत स्तवन, हनुमान सीता शोध कथा, शिकवण कबिराची विषयावर लेख लिहिले आहेत. मात्र, यापेक्षा त्यांचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना विविध ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहिण्याचा असलेला छंद. त्यांनी 2012 मध्ये ज्ञानेश्‍वरी ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहून काढला. मूळ ग्रंथाची पाने 615 असून, त्यांच्या हस्तलिखिताची पाने 315 झाली. त्यानंतर त्यांनी शिवलीलामृत, गजानन विजय, दासबोध श्‍लोक, रामचरितमानस, ओवीबद्ध रामायण, तुकाराम महाराज यांचे मंचरीचे अभंगही लिहून काढले. रामानंदनगरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते सदस्य आहेत.

 उपक्रमांबद्दल विविध ठिकाणी त्यांचे सत्कारही झाले. संचारबंदीच्या काळात त्यांनी महिलांसाठी जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह करण्याचे काम हाती घेतले आहे. आजही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. वेगवेगळ्या ग्रंथांतील शब्द स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिण्याची त्यांची धडपड आहे. त्यातून मनाला शांती मिळते, असे ते सांगतात. 

वय वाढल्यानंतरही तोच उत्साह कायम ठेवता येतो. फक्त त्यासाठी कोणतेतरी काम हाती घ्यावे लागते. एकदा त्यात स्वत:ला गुंतवून घेतले की, ताण-तणाव वाढत नाही. 
विठ्ठल बोभाटे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT