Water After Five Days In Ichalkaranji Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत पाण्यासाठी वणवण, पाच दिवसांनंतर पाणी

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : कृष्णा नळपाणी योजनेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास पावसाचा व्यत्यय निर्माण झाल्यामुळे विलंब झाला आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एक दिवस आड येणारे पाणी आता पाच दिवसानंतर येत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. 

ऐन उन्हाळ्यात नागरिकांना एक दिवस आड पाणी देण्याची किमया यंदा पालिकेकडून प्रथमच केली. पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची राहिली. सुदैवाने यंदा कृष्णा आणि पंचगा नद्यांनाही मुबलक व स्वच्छ पाणी मिळाले. एक दिवस आड पाणी मिळत असल्यामुळे सुखावलेल्या नागरिकांना मात्र हा आठवडा त्रासदायक गेला. पाण्यासाठी अक्षरशः दाहीदिशा करण्याची वेळ आली. उपलब्ध पाणी साठ्याचा काटकसरीने वापर केला. पण पाच दिवस नळाला पाणी आले नाही. त्यामुळे नागरिक पावसाळा तोंडावर आला असताना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. 

कृष्णा योजनेची नवीन टाकलेली जलवाहिनी कार्यान्वित करण्याच्या कामामुळे शहरात पाणीबाणीचा प्रसंग उद्‌भवला. गळतीच्या प्रश्‍नातून सुटका होण्यासाठी दीड किलोमीटरची नवीन जलवाहिनी टाकली. ही जलवाहिनी जोडण्याचे काम बुधवारी हातात घेतले. त्या दिवसांपासून कृष्णा नदीतून पाणी उपसा बंद केला. तो अगदी आज रविवारी रात्रीपर्यंत बंद राहिला. हे काम करीत असताना पावसाचा अडथळा निर्माण झाला.

पावसामुळे वेल्डिंगचे काम करण्यावर मर्यादा आल्या. त्यामुळे कामाचा कालावधी वाढत गेला. त्यातच काळ्यामातीमुळे दलदल निर्माण झाली. त्यामुळे हे काम करताना कसरत करावी लागली. उद्या (सोमवारी) हे काम पूर्ण होईल, अशी आशा पालिका प्रशासनाला आहे. त्यानंतर कृष्णा योजनेतून पाणी उपसा होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा विस्कटलेल्या वेळापत्रकाची घडी बसवावी लागणार आहे. 

पंचगंगा योजनेचा आधार 
शहराला बहुतांशी पाणीपुरवठा कृष्णा योजनेतून होते. पण या योजनेतून पाच दिवस पाणी उपसाच केला नाही. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. अशा परिस्थितीत पंचगंगा नदीतून पाणी उपसा केला. त्यामुळे किमान पाच दिवसानंतरही शहरवासीयांना पाणी मिळत आहे.

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?

'अरे ही तर म्हातारी...' शाहरुखच्या होणाऱ्या सूनेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, आर्यनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates : अपघातामुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

उमेदवारी नको पण हकालपट्टी टाळा, मुंबईला तिकिट मागायला गेलेल्या ४ भाजप पदाधिकाऱ्यांची फजिती; बारमध्ये काय घडलं?

ED Raids: आंध्रातील मद्य गैरव्यवहारप्रकरणी छापे; तेलंगण, तमिळनाडू, कर्नाटक, दिल्लीमध्ये २० ठिकाणी कारवाई

SCROLL FOR NEXT