Water conservation of Shivaji University unfolded through water conservation 
कोल्हापूर

जलसंधारणातून उलगडले शिवाजी विद्यापीठाचे जलवैभव

ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे विद्यापीठ जलयुक्त झाले. त्यामुळे आसपासच्या परिसरातील भूगर्भातील जलसाठाही वाढला. तसेच विद्यापीठाच्या आठशे एकर परिसरातील नैसर्गिक जलप्रवाह, ओढे, पाणथळ जागा यांची नोंद करण्यात आली. यामुळे विद्यापीठाचे जलवैभव समोर आले. 
विद्यापीठात जलसंधारणाची कामे गेल्या पाचवर्षात मोठ्या प्रमाणात झाली. मात्र याच्या सुरुवातीला विद्यापीठाचा ट्रोपोग्राफीकल नकाशा बनवण्यात आला. यामुळे विद्यापीठाच्या विस्तिर्ण परिसरातील उंच - सखल भाग, ओढे, पावसाळ्यात वाहणारे नैसर्गिक जलप्रवाह यांची शास्त्रीय पद्धतीने नोंद झाली. विद्यापीठाचा परिसर हा उंच, सखल असल्याने येथे अनैक नैसर्गिक प्रवाह आहेत. जुना पुणे-बेंगलोर महामार्गाच्या बाजूने येणारे पावसाचे पाणी या मार्गाने पुढे राजेंद्रनगरकडून येणाऱ्या ओढ्याला मिळायचे, तर कुलगुरू निवास इमारत, मानव्यशास्त्र इमारत या बाजूचे सर्व पावसाचे पाणी पुढे प्रतिभानगरातून राजेंद्रनगर मार्गे येणाऱ्या ओढ्याला मिळायचे. विद्यापीठ परिसरातही दोन ओढे आहेत. या शिवाय सुमारे वीस जलप्रवाहही आहेत. विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरातील जलसंधारणाच्या कामामुळे पावसाचे पाणी साठवले गेले. सध्या विद्यापीठात सुमारे 30 कोटी लिटर पाणी साठवले जाते. विद्यापीठातील जलप्रवाहातून वाहणारे पाणी तलाव आणि विहिरीमध्ये साठते. त्यासाठी जमिनीचा उतार पाहून चर मारले आहेत. पावसाळ्यात त्यातून खळाळणारे पाणी या परिसराची शोभाही वाढवते. जलसंधारणाच्या या कामामुळे सर्व जलप्रवाहांची नोंद शास्त्रीय पद्धतीने झाली. यामुळे या परिसरातील जैवविविधताही वाढली आहे. 

जलसंधारणाची कामे करताना जमिनीचा उंचसखलपणा पाहिला जातो. त्यासाठी ट्रोपोग्राफीकल नकाशा बनवला होता. विद्यापीठात छोटे मोठे जलप्रवाह आहेत. त्यातून पावसाळ्यातून वाहणारे पाणी अडवून साठवले आहे. या जलप्रवाहांमुळे भूगर्भातील पाणीसाठाही वाढला आहे. 
-प्रा. डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT