Radhanagari Dam esakal
कोल्हापूर

Radhanagari Dam : राधानगरी धरणाच्या दरवाज्यात तांत्रिक 'बिघाड'

राजू पाटील

नदीला प्रचंड वेगानं पाणी वाढण्याची शक्यता असून काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.

राधानगरी (कोल्हापूर) : राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) मुख्य भिंतीचे मुख्य दरवाजे तांत्रिक दोषामुळं अचानक उचलल्याने राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह भोगावती नदीत (Bhogawati River) सुटला आहे. यामुळं नदीला प्रचंड वेगानं पाणी वाढण्याची शक्यता असून काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. आज पहाटे धरणाच्या मुख्य दरवाजाचे काम करत असताना अचानक दरवाजा उचलला व मुख्य गेटमधून पाण्याचा प्रवाह नदीपात्रात सुरू झालाय.

याचा परिणाम म्हणजे, भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर येणार असून त्यामुळं काठावरील विद्युत पंप, काठावरील नागरिक आणि घाटावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या नागरिकांना व जनावरांना याचा फटका बसू शकतो. तातडीनं नागरिकानी सतर्क राहून काठावर कुणालाही न जाऊ देण्याचा इशारा संबंधित विभागानं केलाय. या दरवाजाचे काम तातडीनं युद्धपातळीवर सुरू असून लवकरच पूर्ववत असेल, अशी माहिती स्थापत्य उप अभियंता विवेक सुतार (Vivek Sutar) यांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT