Water on Kasba Bawda Shiye kolhapur  road Traffic closed
Water on Kasba Bawda Shiye kolhapur road Traffic closed 
कोल्हापूर

कसबा बावडा-शिये मार्गावर पाणी ; वाहतूक बंद

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर (कसबा बावडा) :  पंचगंगेचे पाणी कसबा बावडा-शिये मार्गावर आल्याने या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी, या मार्गावरून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली असून, त्यांना आता शिरोलीमार्गे जावे लागत आहे. 

तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तीन दिवसांत पंचगंगेने ४३ फूट ही इशारा पातळी ओलांडली. शहर व परिसरात आज पावसाची उघडीप असली तरी ग्रामीण भागासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही धुवाँधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेसह जिल्ह्याच्या नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. 


आज सकाळी कसबा बावडा-शिये मार्गावरील शिये पुलाच्या अलीकडे टोल नाक्‍याच्या पुढे पंचगंगेचे पाणी रस्त्यावर आले. सकाळी साधारण दीड फूट पाणी रस्त्यावर होते. त्यातूनच धोकादायक वाहतूक सुरू होती. दुपारनंतर याठिकाणी पाण्याची पातळी तीन ते चार फूट झाल्यानंतर पोलिसांनी राजाराम कारखाना चौकात या मार्गावरील वाहतूक बॅरिकेड्‌स लावून बंद केली. 

हेही वाचा- 'या' तालुक्‍यातील 18 पैकी 12 प्रकल्प ओव्हरफ्लो, तीन मध्यम प्रकल्प भरले -

राजाराम बंधारा यापूर्वीच पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे वडणगे, केर्ली, केर्लेसह कसबा बावड्यातून औद्योगिक वसाहतीकडे कामाला जाणाऱ्या कामगारांसाठी हा मुख्य मार्ग होता; पण त्यावरही पाणी येऊन वाहतूक बंद झाल्याने या कामगारांसह कारखाना मालकांना आता शिरोली नाक्‍यामार्गे शिरोली औद्योगिक वसाहतीत जावे लागत आहे.

संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT