Water Released From Chitri Project In Ajra Taluka For Flood Control Kolhapur Marathi News
Water Released From Chitri Project In Ajra Taluka For Flood Control Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

पूर नियंत्रणासाठी आजरा तालुक्‍यातील "या' प्रकल्पातून सोडले पाणी, विद्युत गृहातून 180 क्‍युसेकने विसर्ग

रणजित कालेकर

आजरा : येथील चित्री प्रकल्पातून पूर व धरणातील पाणीसाठा नियंत्रणसाठी पाटबंधारे विभागाने आज (ता. 11) दुपारी पाणी सोडले. विद्युत गृहातून 180 क्‍युसेकने विसर्ग होत असून वीजनिर्मितीला सुरवात झाली आहे. प्रकल्पात आज अखेर 95 टक्के पाणीसाठा झाला आहे. 

प्रकल्पापाची क्षमता 1886 दस लक्ष घनफुट इतकी आहे. आज अखेर धरणात 1792 दसलक्ष घनफुट पाणीसाठा झाला आहे. येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्‍यता व्यक्त होत असल्याने जिल्हा प्रशासनाने पूर नियंत्रणासाठी धरणातील पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर या प्रकल्पातील पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे आजऱ्याचे शाखाधिकारी एन. डी. मळगेकर यांनी सांगीतले. 

धरणात अतिवृष्टीच्या काळात दररोज 3 हजार क्‍युसेकने पाणी येत होते. सध्या पावसाने उसंत घेतली आहे. चित्री धरण क्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळत असल्याने सरासरी 700 क्‍युसेकने पाणी धरणात येते आहे. जर अतिवृष्टी झाल्यास पाण्याची आवक वाढणार आहे. त्यामुळे धरण जलदगतीने भरेल व पाणीसाठा नियंत्रीत करणे कठीण जाणार आहे.

या प्रकल्पाच्या सांडव्याला गेट (दरवाजे) नाहीत. प्रकल्प भरल्यावर पाणी सांडव्यावरून वेगाने चित्रीच्या पात्रात जाते. त्याच्यावर नियंत्रण करता येत नाही. त्यामुळे वीज गृह सुरु करून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तासाला दोन हजार युनिट म्हणजे 2 मेगा वॉट वीजेची निर्मितीला सुरवात झाली आहे. उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी सोडण्याबरोबर वीज निर्मिती केली जाते. हा दुहेरी फायदा असतो. पण पावसाळ्यात धरणसाठा व पुरनियंत्रणासाठी पाणी सोडले आहे. 

चार दिवसात प्रकल्प भरण्याची शक्‍यता 
चित्री प्रकल्पात दररोज सातशे ते आठशे क्‍युसेकने पाणी येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प चार दिवसात भरण्याची शक्‍यता आहे. अतिवृष्टी झाल्यास एका दिवसातही प्रकल्प भरू शकतो असे श्री. मळेगकर यांनी सांगितले. 

सावधानतेचा इशारा 
चित्री प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले असून नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार विकास अहिर यांनी केले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT