Kalammawadi Dam esakal
कोल्हापूर

...अखेर 'जलसंपदा'ला काळम्मावाडी धरणातील पाणी साठ्याचे सूत्र सापडले; अतिरिक्त पाण्याचा होणार विसर्ग

Kalammawadi Dam : गळती समस्येमुळे सलग तिसऱ्या वर्षी धरणात क्षमतेपेक्षा कमी साठा राहणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

आगामी काळात गळती प्रतिबंधक उपाययोजना झाल्यानंतरच धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करणे सुरू होईल, हे स्पष्ट झाले आहे.

राधानगरी : अखेर जलसंपदा विभागाला (Water Resources Department) काळम्मावाडी धरणातील (Kalammawadi Dam) यंदाच्या पाणी साठ्याचे सूत्र सापडले. यंदा धरणात २२ टीएमसी म्हणजे ६४३ मीटर पाणीपातळीपर्यंत पाणीसाठा ठेवण्यात येणार आहे. गळती समस्येमुळे सलग तिसऱ्या वर्षी धरणात क्षमतेपेक्षा कमी साठा राहणार आहे.

२०२२ मध्ये तज्ज्ञ समितीच्या निर्देशानुसार, सांडवापातळीपर्यंत म्हणजे २० टीएमसी इतकाच पाणीसाठा ठेवला होता. मागील वर्षी धरण पाणीसाठ्यात ४.५० टीएमसीने वाढ करून तो २४.५० ठेवणला. यंदा मागील वर्षापेक्षा पाणीसाठा अडीच टीएमसीने घटवण्यात येणार आहे. आधी सलग दोन वर्षे क्षमतेपेक्षा कमी साठा ठेवल्याने यंदा धरणात किती पाणीसाठा ठेवायचा याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविला होता.

त्यांच्या अभिप्रायानुसार धरणातील यंदाच्या पाण्यासाठी निश्चिती झाली आहे. यंदाचा पाणीसाठा धरणाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा साडेतीन टीएमसीने कमी राहणार आहे. धरणाची पूर्ण संचय क्षमता २५.४० टीएमसी इतकी आहे. लाभ क्षेत्रात शेती व पिण्यासाठी होणाऱ्या पाणी वापराच्या अभ्यासाअंती धरणातील यंदाच्या पाणीसाठा वर्षभर पुरेल इतका राहणार आहे. आगामी काळात गळती प्रतिबंधक उपाययोजना झाल्यानंतरच धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करणे सुरू होईल, हे स्पष्ट झाले आहे. सध्या धरणात २२ टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. निश्चित केलेल्या पाणीसाठापेक्षा अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

यंदा धरणात २२ टीएमसी पाणीसाठा ठेवण्याचे निर्देश मिळाले आहेत. यानुसार तितकाच पाणीसाठा ठेवण्यात येईल. साठ्यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील वर्षी धरणात २४.५० टीएमसी पाणीसाठा ठेवला. तरीही पावसाळ्यापूर्वी धरणात तीन टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला. वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा धरणात राहणार आहे.

-प्रशांत कांबळे, उपअभियंता, काळम्मावाडी धरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT