Water from a sanitation house on a food cart in Kolhapur 
कोल्हापूर

Video- धक्कादायक ; कोल्हापुरात खाद्य पदार्थाच्या गाडीवर स्वच्छता गृहाचे पाणी 

राजेश मोरे

कोल्हापूर - पाणीपुरीच्या गाडीवर स्वच्छतागृहाच्या पाण्याचा वापर होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसा अज्ञातांनी रंकाळा येथील पाणीपुरीचा गाडा पाडून त्यातील साहित्य विस्कटून दिले. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु या व्हिडिओमुळे नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत होता. 

ताराबाई रोड ते संधामठाकडे जाणाऱ्या मार्गावर एका स्वच्छता गृहाच्या वरील टाकीचे पाणी एक व्यवसायिक भरतो. त्यानंतर तो ते पाणी पाणीपुरीच्या गाडीजवळ ठेवलेल्या स्टिलच्या पिपात ओतत असल्याचे दिसून आले. जसजसा हा व्हिडिओ व्हायरल झाला तस तसे याबाबत संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या. 

दरम्यान, सायंकाळी काही अज्ञातांनी रंकाळा येथील एका पाणीपुरीच्या गाडीवर हल्लाबोल केला. ती गाडी पलटी करून त्याच्याकडील पाणी व पुऱ्या रस्त्यावर फेकून दिल्या. अचानक घडलेल्या या प्रकरामुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. रंकाळा येथे दररोज मोठी गर्दी होते. अशा गर्दीच्या ठिकाणी असा प्रकार होत असल्याबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केलाजात होता. पण रात्री उशिरा पर्यंत याबाबतची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती. 

पाहा व्हिडिओ - 

<

>

संपादन - धनाजी सुर्वे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT