Water Sources Of In Uttur Village Revealed From The Documentary Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

माहितीपटातून उलगडले उत्तूरमधील पाण्याचे स्रोत, शिक्षकाचा असाही उपक्रम

अशोक तोरस्कर

उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथे भूतकाळात पाण्याचे स्रोत कसे व कुठे होते याबाबत उत्तूर विद्यालयातील शिक्षक अशोक शिवाजी जाधव यांनी माहितीपट बनविला आहे. याचे अनावरण सरपंच वैशाली आपटे व जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांच्या उपस्थितीत झाले. 

या माहितीपटात 1970 ते 1990 काळातील गावतलावासह दहा ठिकाणी पाण्याचे जुने स्रोत होते. यापैकी काही स्रोत आजही सुरक्षित आहेत. नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणचा वापर करतात. पाच एकर क्षेत्रात गावतलाव आहे. गावच्या पूर्वेला वडभाव आहे. याशिवाय नाईकवाड्यांची विहीर, हरिजन बांधवांची विहीर, लक्ष्मी मंदिरजवळील आड भाव, दत्त मंदिर, कंठास्वामी, दड्डीकर, गोपाळराव सोनवडेकर, अमोल देशपांडे, फडणवीस यांच्या परिसरात असणाऱ्या पाण्याच्या स्रोतांना या माहितीपटात उजाळा दिला आहे. 

पूर्वी पाण्याच्या दुर्भिक्षाचा कालखंड, पाण्यासाठी पाणवठ्यावर असलेली माणसांची वर्दळ, चुंबळीच्या आधारे डोक्‍यावर एक व काखेत एक घागर घेऊन जाणाऱ्या महिलांची धावपळ, मातीच्या, पत्र्याच्या, तांब्याच्या, पितळेच्या घागरी यांचे वर्णन यामध्ये चित्रित केले आहे. 

गावतलावाच्या रहाटाची दिशा, धोबीघाट याचा त्या काळी होणारा वापर, विहिरीने तळ गाठल्यावर पाणी भरण्यासाठी होणारी घालमेल, जलसमाधी घेतलेली घागर गळाने काढण्याची पद्धत, याबाबत सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सायकलची चाके जोडून तयार झालेल्या पाण्याच्या गाड्याची जन्मकथा यामध्ये दाखवली आहे. 

चांगला प्रतिसाद
उत्तूरमधील पाण्याची पूर्वीची स्थिती नव्या पिढीला कळावी यासाठी माहितीपटाची निर्मिती केली. या माहितीपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- अशोक जाधव, माहितीपटाचे निर्माते-दिग्दर्शक 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

SCROLL FOR NEXT