water valve leakage in ichalkaranji and water wastage on road in kolhapur 
कोल्हापूर

Video : ऐन उन्हाळ्यात पाईपलाईनला गळती; इचलकरंजीत लाखो लिटर पाणी वाया

पंडित कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या कृष्णा योजनेच्या जलवाहिनी व्हॉल्वला मोठी गळती लागली. यातून सुमारे 25 फुट पाण्याचा फवारा आकाशात उडत होता. टाकवडे वेस परिसरात वर्दळीच्या रस्त्यालगतच हा प्रकार घडला. त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करणार्‍यांनी नागरिकांनी याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रण केले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने कृष्णा नदीतून पाणी उपसा बंद केला. त्यानंतर तातडीने व्हॉल्व दुरुस्तीला सुरुवात केली. 

मात्र यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. सध्या शहरात तीन ते चार दिवस आड पाणी येत आहे. त्यातच या गळतीमुळे पून्हा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. इचलकरंजी शहराला कृष्णा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. मजरेवाडी येथे उपसा केंद्र आहे. तेथून जलवाहिनीने शहरात पाणी आणण्यात आले आहे. टाकवडे वेस नजिक व्हॉल्वची कोणीतरी छेडछाड केली. त्यानंतर व्हॉल्व मोडला व त्यातून प्रेशरने पाण्याचा फवारा आकाशात उडाला. बराच वेळ हा फवारा होता. यामुळे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची मात्र मोठी तारांबळ उडाली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींनी घेतलेल्या बैठकीत काय झालं? CM फडणवीसांनी दिली माहिती

स्टार प्रवाहवरील या अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न ! ठाण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाशी बांधली लग्नगाठ

Nagpur News : नागपुरात 'डिजिटल अरेस्ट'चा थरार! आतंकवादाच्या खोट्या केसची भीती दाखवून महिलेला १३ लाखांचा गंडा; बनावट 'अरेस्ट ऑर्डर'ने उडविली झोप

Ambethan News : भामा आसखेडमध्ये 'साठीत' साठा, पण भविष्यात चिंतेची लाट! मोठ्या पाणी योजना सुरू होताच धरण तळ गाठणार; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Jayant Patil : आदिवासी जमिनींचा मोठा घोटाळा उघडकीस? सभागृहात घणाघाती आवाज; जयंत पाटील यांचा प्रशासनावर थेट हल्ला!

SCROLL FOR NEXT