Water was brought to kolhapur city from Rankala Lake through Rankala Tower by siphon method 
कोल्हापूर

रंकाळा प्रदूषणमुक्तीचा विचार 137 वर्षांपूर्वी झाला अन् 'धुण्याची चावी' ची निर्मिती झाली...

सकाळवृत्तसेवा

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान वेगाने विस्तारले. जलस्रोत प्रदूषणमुक्तीच्या अनेक नवीन संकल्पना पुढे आल्या; पण कोल्हापूरचा श्‍वास असलेल्या रंकाळा प्रदूषणमुक्तीचा विचार 137 वर्षांपूर्वी झाला आणि त्यातूनच 'धुण्याची चावी' आकाराला आली. बहुआयामी असलेली ही योजना गेल्या काही वर्षांत मोडकळीस आली. योजनेच्या जतनासाठी येथे स्मृतिवन उभारले. मात्र, सद्यःस्थिती पाहता निराशाजनक चित्र असले तरी अजूनही ही योजना आपले अस्तित्व टिकवून आहे.

धुण्याची चावी म्हणजे कपडे धुण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी, जनावरांच्या पाण्यासाठी किंवा त्यांना धुण्यासाठी एकाच ठिकाणी केलेली बहुआयामी योजना आहे. रंकाळा तलाव प्रदूषणमुक्तीसाठीचा असा शाहूकालीन पर्याय म्हणून आजही ही योजना मार्गदर्शक ठरते. रंकाळा तलावातून रंकाळा टॉवरमार्गे सायफन पद्धतीने या ठिकाणी पाणी आणण्यात आले. त्याच्यासाठी कोणतीही इतर ऊर्जा वापरावी लागत नाही. जाऊळाचा बालगणेश मंदिरापासून दुधाळी मार्गावर महाराणा प्रताप हायस्कूलशेजारी ही योजना आहे. 1883 मध्ये ही योजना कार्यरत झाली. दगडी कट्टे बांधून 120 नळ येथे जोडले. प्रत्येक नळाखाली दगडाचे एक कुंड व कपडे धुण्यासाठी मोठा घडीव दगड. अंघोळीसाठी 38 स्वतंत्र स्नानगृहेही येथे बांधली. या ठिकाणी पाण्याचा वापर झाल्यानंतर या कुंडातून बाहेर पडणारे पाणी पाटाद्वारे शेतीला पुरवले. 137 वर्षांपूर्वी बांधलेल्या या योजनेसाठी 25 हजार 740 रुपये इतका खर्च आला होता. मात्र, नंतरच्या काळात त्याच्या जतन व संवर्धनासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला.

दहा - बारा वर्षांपूर्वीपर्यंत 120 नळांपैकी 70 ते 80 नळ चालू होते. दरम्यान, शहरात घराघरांत नळ आले आणि येथील नळांचाही वापर कमी होऊ लागला. त्यामुळे काही नळ बंद केले. डिसेंबर 2015 मध्ये मुख्य जलवाहिनीतील गाळ काढून 29 नळ सुरू केले. एकूणच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, जलस्रोत प्रदूषणमुक्तीचा आदर्श विचार आणि एखाद्या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी लोकसहभाग घेताना त्यांना उपलब्ध करून दिलेला आदर्श पर्याय, अशा विविध अंगांनी "धुण्याची चावी' या अमूल्य ठेव्याचा आजवर गौरव झाला आहे आणि म्हणूनच हा ठेवा जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT