A wave of fake stock market companies in Kolhapur; The lure of 12 to 15 percent interest per month 
कोल्हापूर

कोल्हापुरात बनावट शेअर मार्केट कंपन्यांचे पेव ;  महिन्याला 12 ते 15 टक्के व्याजाचे आमिष 

निवास चौगले

कोल्हापूर : महिन्याला बारा-पंधरा टक्के व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून गुंतवणूक करून घेणाऱ्या बनावट शेअर मार्केट कंपन्यांचे पेव कोल्हापुरात फुटले आहे. पहिल्यांदा गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराला दुसऱ्याने केलेल्या गुंतवणुकीतील पैसे परत देण्याचा हा प्रकार म्हणजे "एकाची टोपी दुसऱ्याच्या डोक्‍यावर' घालण्यासारखा आहे. त्यातून मोठी फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. 

अशाच पद्धतीने शेअर मार्केटमधील कंपनीकडून झालेल्या फसवणूक प्रकरणी कालच (ता. 25) कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर या कंपन्यांचा आढावा घेतला असता कोल्हापुरात अशा कंपन्यांचे पेवच फुटल्याचे समोर आले आहे. 
पहिल्या शंभर लोकांना गुंतवणुकीचे पैसे परत देऊन इतरांचा विश्‍वास मिळवण्याच्या या प्रयत्नात शेवटच्या टप्प्यात गुंतवणूक केलेल्या व्यक्तीची फसवणूक या व्यवहारात नक्की आहे. या कंपन्यांवर वेळीच कारवाईची गरज आहे.

कोल्हापुरात 2001 ते 2003 या काळात अशी एखादी कंपनीच होती, त्या कंपनीनेही अशीच फसवणूक केली. या कंपन्यांचे मुख्यालय मुंबईत, त्याचा मालक अन्य राज्यांत आणि कंपनीसाठी पैसे गुंतवणूक करायला लावणारे एजंट स्थानिक असतात. 2003 साली अशीच गुंतवणूक करून घेतलेल्या एका एजंटाने आत्महत्या केली, तत्पूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत गुंतवणूकदारांची नावे लिहिली, त्यामुळे पैसेही गेले आणि उलट पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला. अशीच परिस्थिती आता सुरू आहे. 

या कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी कमिशनवर एजंट नेमले आहेत. गुंतवणुकीच्या 15 ते 20 टक्के कमिशन या एजंटांना दिले जाते. गुंतवणूकदाराला महिन्याला 12 ते 15 टक्के परताव्याचे आमिष दिले जाते. त्यातून सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे आणि परतावाही चांगला मिळतो; पण गुंतवणूकदारांची संख्या जशी वाढेल, त्यानंतर मात्र शेवटी गुंतवणूक करणाऱ्याला पैसेच मिळत नाहीत. काल गुन्हा दाखल झालेले प्रकरण हे याच स्वरूपाचे आहे. युरोप, अमेरिकेत गुंतवणूक केलेल्या पैशावरच संबंधिताला परतावा देण्याचा कायदा आहे, तो भारतात नसल्याने या कंपन्या मनमानी करत लोकांची लुबाडणूक करत आहेत. 

कोल्हापुरात पाच कंपन्या 
पूर्वी अशा प्रकारची एकच कंपनी कोल्हापुरात होती, आता शाहूपुरी, पितळी गणपती परिसर आणि इतरत्र, अशा पाच कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यात स्थानिक तरुणच एजंट, कंपनीचे फ्रॅंचाईजी म्हणून काम करत आहेत. आपल्या ओळखीच्या लोकांना या तरुणांकडून गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले जाते. 


जेवढा परतावा जास्त, तेवढा धोका अधिक, हे गुंतवणूक क्षेत्राचे ब्रीदवाक्‍य आहे. कोणत्याही गुंतवणुकीचा परतावा हा खात्रीशीर नसतो. अशा परिस्थितीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून केलेल्या गुंतवणुकीत फसवणुकीची शक्‍यता असते. त्यातही गुंतवणूकदार अशा कंपन्यांना प्रश्‍न विचारत नाही, हे प्रश्‍न विचारले पाहिजेत. 
- रवींद्र पाटील, शेअर मार्केट तज्ज्ञ. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT