कोल्हापूर

सहा तालुक्‍यांवर हवी करडी नजर 

सदानंद पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. लॉकडाउनच्या 60 दिवसात जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 56 पर्यंत गेली आहे. सरासरी रोज एक रुग्ण सापडत आहे. अजुनही 2 हजार स्वॅबची तपासणी होणे बाकी आहे. त्यात किती पॉझिटिव्ह सापडणार, याचा कोणालाच अंदाज नाही. रुग्णांच्या वाढत्या संख्येने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

म्हणूनच रेड झोनमधून येणाऱ्या लोकांना नियंत्रित करणे, संस्थात्मक अलगीकरणाची काटेकारे अंमलबजावणी करणे, कमीत कमी वेळात स्वॅबची तपासणी करणे व भेटणारी प्रत्येक व्यक्‍ती ही कोराना बाधित आहे, असे समजून सोशल डिस्टन्सिंग ठेवले तर कोरोनाला नियंत्रणात ठेवणे शक्‍य होणार आहे. 

जिल्ह्यातील पहिली कोरोना केस 26 मार्च रोजी पॉझिटिव्ह आली. तेव्हापासून कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. 8 मेपासून रुग्णांची संख्या ही 40 पेक्षा अधिक झाली आहे. 26 मार्च ते 4 मेपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे केवळ 15 रुग्ण होते. ही संख्या आज जवळपास तिप्पट झाली आहे. जेव्हापासून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर, सातारा या जिल्ह्यातून लोकांनी कोल्हापुरात प्रवेश करण्यास सुरुवात केली तेव्हापासून ही रुग्णसंख्या वाढीला लागली आहे. 

जिल्ह्यात येणाऱ्या लोकांच्या तुलनेत स्वॅब संकलन, त्याचा अहवाल, संस्थात्मक अलगिकरणची व्यवस्था व तज्ञ मनुष्यबळ यात तफावत आहे. त्यामुळेच आज 2 हजार पेक्षाअधिक स्वॅबची तपासणी होवू शकलेली नाही. या सर्व स्वॅबचे अहवाल घेणे, त्या आधारे बाधितांवर उपचार व इतरांचे संस्थात्मक किंवा घरातच अलगणीकरण करणे आवश्‍यक आहे. ही सर्व परिस्थिती आटोक्‍यात आल्यानंतरच रेड झोनमधील लोकांना प्रवेश देणे आवश्‍यक आहे. असे झाले नाहीतर पुन्हा ही सर्व यंत्रणा कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

कोरोना प्रसाराची प्रमूख कारणे 
-रेडझोनमधून येणारे प्रवासी 
-स्वॅब केंद्रावर संशयितांचा वावर 
-लक्षणे नसल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा 
-अलगीकरण केंद्रात मुक्‍त वावर 

काय करणे आवश्‍यक 
*संस्थात्मक अलगीकरण हवे काटेकोर 
*रुग्णांना कक्षाबाहेर सोडण्यावर निर्बंध 
*रेड झोनमधील प्रवाशांना हवा ब्रेक 
*संस्थात्मक अलगीकरण व्यवस्था वाढवणे 
*उपलब्ध बेडच्या प्रमाणात इनकमिंक 
*बेकायदेशीर प्रवाशांना रोखणे 

सीपीआर येथे हवा मार्गदर्शन कक्ष 
रेड झोनमधून येणाऱ्या बहुतांश लोकांना स्वॅब घेण्यासाठी सीपीआर येथे पाठवले जाते. मात्र सीपीआर येथे आल्यानंतर जायचे कोठे?,असा प्रश्‍न असतो. स्वॅबसाठी संबंधित व्यक्‍ती सीपीआर येथे फिरते. जर ती कोरोनाग्रस्त असेल तर त्यापासून अनेकांना धोका होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे सीपीआरमध्ये प्रवेश केल्यानंतर जायचे कुठे याचे मार्गदर्शन करण्याची प्रवेशदवारापासूनच व्यवस्था असणे आवश्‍यक आहे. तसेच ऍपसाठी रांगा लागतात. त्यामुळे याठिकाणीही मनुष्यबळ वाढवणे आवश्‍यक आहे. 

सामाजिक सलोख्याला धोका 
जिल्ह्यातील शाहूवाडी, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी या तालुक्‍यातील हजारो लोक मुंबई, पुणे परिसरात नोकरी व व्यवसायानिमित्त स्थिरावले आहेत. मात्र कोरोनामुळे सर्व उदयोग, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे त्यांच्याही पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे परवानगी व विनापरवानगी लोकांच्या झुंडीच्या झुंडी गावाकडे येत आहेत. त्यामुळे गाव विरुध्द शहर, असे वातावरण निर्माण झाले आहे. यातून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

Latest Marathi News Live Update : ‘जी राम जी’वर लोकसभेची मोहोर ; रोजगारवाढीचा केंद्र सरकारचा दावा

Viral Video Fact Check: बेघर होऊन भीक मागताना सापडलेली महिला खरंच क्रिकेटर सलीम दुर्रानी यांची पत्नी? काय आहे सत्य?

SCROLL FOR NEXT