कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषद पदाधिकारी अधिकाऱ्यांबाबत काय म्हणतात..

प्रतिनिधी

कोल्हापूर : नागरीसुविधा, जनसुविधा या कामांबाबत अधिकारी सदस्यांनाच चुकीची माहिती देत आहेत. अधिकाऱ्यांमध्ये गैरमेळ असल्याने त्याचा फटका लोकप्रतिनिधींना बसत आहे. पुढील काळात, असे अजिबात चालणार नाही. यात जर सुधारणा झाली नाहीतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थायी समितीत अधिकाऱ्यांना दिला. अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेत स्थायी समिती समितीची सभा पार पडली. सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, महिला व बालकल्याण सभापती डॉ.पदमाराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, सदस्य युवराज पाटील, अरुण इंगवले, राहूल आवाडे व खाते प्रमुख उपस्थित होते. 
शासनाने आदेश देवूनही सदस्यांना चुकीची माहिती दिली जात आहे, असे अजिबात चालणार नाही. जर यात सुधारणा झाली नाहीतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अशा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी स्वनिधीची खरेदी रुग्ण कल्याण समितीतून करावी, अशी सुचना बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी मांडली. 

कोरोनासाठी 30 कोटींची खरेदी 
ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी कोरोनाच्या अनुषंगाने होत असलेल्या खरेदीचा मुददा उपस्थित केला. किती कोटींची खरेदी झाली, कोणी खरेदी केली, जिल्हा परिषदेचा याच्याशी काही संबंध आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. यावर ही खरेदी जिल्हा परिषदेतून झाली नसून जिल्हा नियोजन मंडळ तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातून झाली आहे. ही खरेदी सुमारे 30 कोटी रुपयांची असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगत यासाठी पाच सदस्यीय समिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दलित वस्ती यादीवरुन वाद 
दलित वस्ती निधी वितरणाच्या तयार झालेल्या याद्यात बदल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. एखाद्या ग्रामपंचायतीला निधी दिल्यानंतर तो रदद करता येणार नाही,अशी भूमिका काही सदस्यांनी घेतली. त्यामुळे या याद्या थांबवण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

आज स्थायी समिती सभा झाली. काही प्रकरणात अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली आहे. ही दिशाभूल सदस्यांचीच केली आहे. यामुळे सामान्य लोकांसोबत काय न्याय होत असेल याचा विचारच केलेला बरा. याबाबत संबंधितांना समज देण्यात आली आहे. मात्र आता बदल झाला नाहीतर येणाऱ्या सर्वसाधारण सभेत संबंधितांच्या कार्यमुक्‍तीचा निर्णय घेतला जाईल. 
- सतीश पाटील, उपाध्यक्ष. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT