What do you think of the city's development?
What do you think of the city's development? 
कोल्हापूर

शहराच्या विकासाठी तुम्हाला काय वाटते? 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : "आपले शहर आपले बजेट ही संकल्पना "सकाळ' सात ते आठ वर्षापासून कोल्हापूर शहरात राबवत आहे. महापालिका बजेट सादर होण्यापूर्वी बजेटबद्दल लोकांच्या काय अपेक्षा आहेत?, हे सकाळ वाचकांकडून जाणून घेण्यात येतात. या अपेक्षा पुस्तकरुपाने महापालिकेच्या स्थायी समितीकडे दिल्या जातात. योग्य आणि चांगल्या सूचनांचा समावेश या बजेटमध्ये होतो.

यंदाही या महिन्याअखेर महापालिका प्रशासन बजेट सादर करणार आहे. त्यापूर्वी वाचकांनी आपले "शहर आपले बजेट' या संकल्पनेअंतर्गत "सकाळ'कडे फोटो आणि नावासह प्रतिक्रिया पाठवाव्यात. 

महापालिकेचा कारभार हा लोकाभिमूख असावा, अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा असते, पण महापालिका आणि नागरिकांत संवादाचा अभाव असतो, हा अभाव दूर करण्यासाठी सकाळ काही वर्षापासून पुढाकार घेते. समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे तज्ञ, मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, तरुण, महिला असतात.

या प्रत्येकाचे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चांगले ज्ञान असते. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग महापालिकेला आणि पर्यायाने शहराला व्हावा, हा याचा मूळ हेतू आहे. यंदाचे बजेट महिनाअखेरपर्यंत सादर केले जाईल. लोकांना नेमक्‍या कोणत्या सोयी, सुविधा हव्या आहेत. उपलब्ध सोयी, सुविधांबद्दल नागरिक समाधानी आहेत का? या सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे. नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. "आपले शहर आपले बजेट" या सदराच्या माध्यमातून या अपेक्षांना सकाळमधून प्रसिध्दीही दिली जाईल. या सूचना महापालिकेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आमची राहिल. तसेच लोकोपयोगी सूचनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्याच्यादुष्टीने "सकाळ' पाठपुरावा करणार आहे. शहरातील आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पर्यावरण, औद्योगिक विकास, व्यापार,पायाभूत सुविधा, पाणी व्यवस्थापन याबाबतीत लोकांना कोणत्या सुविधा हव्यात. याचा समावेश या सूचनांत असावा. 

सूचना या व्हॉटसऍप नंबरवर पाठवाव्यात 
9822907046- डॅनियल काळे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT