What happened to the certified swab kit purchased? 
कोल्हापूर

खरेदी केलेल्या प्रमाणित स्वॅब कीटचे काय झाले?

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत स्वॅब तपासणीसाठी वापरलेली काही कीट प्रमाणित नाहीत. अप्रमाणित कीटमधून केलेली तपासणी अधिकृत मानावी कशी तसेच जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या प्रमाणित कीटचे काय झाले, याची चौकशी व्हावी अशी मागणी प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. 

 देसाई यांनी दिलेली माहिती अशी, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागणारे साहित्य भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद, स्वास्थ्य अनुसंधान विभाग, स्वास्थ और परिवार कल्यान मंत्रालय (आयसीएमआर) संस्थेमार्फत तपासणी केलेली साहित्य तसेच स्वॅब तपासणीची कीट खरेदी करावीत, अशा सूचना केंद्र सरकारच्या आहेत.

त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेली कीट शेंडापार्क येथील सुक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रगोयशाळेस दिली; मात्र आरसीएमआरआयने प्रमाणित केलेले कीट कोरोना येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी वापरली जात नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनाचे पालन होत नाही. त्यामुळे सध्या वापरली जाणारी किटही अप्रमाणित आहेत का असा संशय आहे तसेच कोरोना स्वॅब तपासणी करणाऱ्यांत काही कर्मचारी प्रशिक्षित नाहीत तरीही ते तपासणी प्रक्रियेत कसे काम करतात सर्व बाबींची चौकशी व्हावी. 
मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री व हसन मुश्रीफ यांना पाठविले आहे. अशीही माहिती श्री देसाई यांनी दिली आहे. 

दरम्यान, याबाबत राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या व्हीसीमध्ये असल्याने बोलू शकत नाही या प्रकरणाची माहिती घेऊन बोलेन असे सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

US Iran Tensions : अमेरिका कधीही सुरु करु शकते युद्ध, सैन्य तैनात करणे फक्त इशारा नाही, इराणला कोणी केले सावध ?

IND vs PAK : प्लॅन फसला! पराभवानंतर पाकिस्तानच्या कॅप्टननं स्पिनर्सवर फोडलं खापर; म्हणाला, चुकांची किंमत मोजली

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Construction Worker Scam: बीडमध्ये तीन हजार द्या अन् बांधकाम कामगार बना; कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला, बोगस नोंदी, कोट्यवधींच्या निधीवर दरोडा!

SCROLL FOR NEXT