What happened to the five-day yoga day?  
कोल्हापूर

पाच दिवस योग उत्सवाच्या निर्णयाचे काय झाले? 

युवराज पाटील

शिरोली पुलाची : आज आंतरराष्ट्रीय योगदिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला; मात्र योगविद्येचा प्रचार व विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षण संस्था, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला योग दिन साजरा करण्याचा तसेच दरवर्षी 21 ते 26 जानेवारी दरम्यान पाच दिवस योग उत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने चार वर्षापूर्वी घेतला होता. त्याच्या अमंलबजावणीकडे दुर्लक्ष होत असून, योग शिक्षणासाठी घेतलेल्या निर्णयाचा बोजवारा उडाला आहे. 

संयुक्त राष्ट्राने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 2015 मध्ये घेतला. त्यानुसार भारतात योगदिन म्हणून साजरा होतो; मात्र वर्षातून केवळ एक दिवस योग दिन साजरा करणे पुरेसे नाही. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांमध्ये योगविद्येबाबत जागृतीसाठी व सातत्याने कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना केंद्राने राज्यांना दिल्या.

केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर 21 जून हा योगदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याची आणखी व्याप्ती वाढविण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण संस्था व विद्यापीठांमध्ये प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला योग दिवस साजरा करणे अपेक्षीत होते, त्याचबरोबर दर वर्षाला 21 ते 26 जानेवारी या दरम्यान पाच दिवस योग उत्सव साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामध्ये योग विद्येबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे लागणार होते; मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही नाही. 

21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिना व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला योगदिन असतो, याची माहितीच अनेक शिक्षण संस्थाना नाही. काही शिक्षण संस्थेत प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला योगदिन साजरा केल्याचा कागदी अहवाल सादर केला जातो. 

समित्या आहेत कुठे ? 
योग विद्येच्या प्रचार व प्रसार साठी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय व शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हासस्तरीय, अशा दोन समित्या स्थापन करण्यात येणार होत्या; मात्र या समित्या आहेत का ? असतील तर त्यांनी काय काम केले हा संशोधनाचा विषय आहे. 
 

योग विद्या सर्व सामान्य माणसाला समजण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे ; मात्र त्याच्या अमंलबजावणीकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यायला पाहिजे. 
- अनिल पाटील, योग शिक्षक, नागाव. 


दृष्टिक्षेप 
- 21 ते 26 जानेवारी पाच दिवस योग दिवस करण्याचा निर्णय 
- योग शिक्षणासाठी घेतल्याचा निर्णयाचा बोजवारा 
- अनेक शिक्षण संस्थांना निर्णयाची माहितीच नाही 
- काही संस्थांकडून कागदी अहवाल सादर करण्याचा प्रकार 
 

कोल्हापूर

कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Forecast Maharashtra : मान्सून रेंगाळला ! राज्यातील 'या' भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, पुण्यातही तापमानात होणार वाढ

Pandharpur Vitthal: अधिक मासात विठुरायाच्या चरणी ९.४६ कोटींचे दान; १४ लाख भाविकांनी घेतलं दर्शन; हुंडी, देणग्या आणि सोने-चांदीचा वर्षाव

Police Constable Death : चंदगड हादरलं! 42 वर्षीय पोलिसानं स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य; लष्करात 17 वर्षे बजावलीये सेवा, सध्या मुंबईत होते कार्यरत

Monsoon 2026: पावसाचा वेग मंदावला! अरबी समुद्रातील कोरडे वारे, बंगालचे बाष्प प्रशांत महासागराकडे, हवामानशास्त्रज्ञांनी नेमकी काय सांगितली कारणे?

शिवसेनेत पुन्हा भूकंप! ६ खासदार फुटण्याची भीती, उद्धव ठाकरे गट सक्रिय; अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

SCROLL FOR NEXT