corona 
कोल्हापूर

कोविडविरोधातील लढाईला पूरक असे कुठले संशोधन शिवाजी विद्यापीठात आहे सुरू.....वाचा

ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : घर किंवा दवाखान्याचा दरवाजा, खिडकी किंवा पार्टिशनची काच, पडदे यांना जर विशिष्ट पॉलिमरचे नॅनो कोटिंग केले तर कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखता येतो, असा संशोधकांचा दावा आहे. याबाबतचे संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी विभागात सुरू आहे. अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीचा हा प्रायोगिक प्रकल्प असून त्यासाठी नॅनो सायन्स विभागाला दहा हजार डॉलरचा निधीही देण्यात येणार आहे. 

अमेरिकेतील होस्टन शहरातील क्रेटॉन पॉलिमर या बहुराष्ट्रीय कंपनीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशिष्ट प्रकारचे पॉलिमर बनवले. या पॉलिमरवर प्रक्रिया करून त्याचा नॅनो कोट बनवण्याचा प्रायोगिक प्रकल्प शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी विभागाला देण्यात आला. हा प्रकल्प दोन भागात असून त्याबाबतचे काम सुरू झाले आहे. ते ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण होईल.

कंपनीकडून आलेल्या पॉलिमरवर प्रक्रिया करून त्यापासून नॅनो कोट बनवण्यात येतो. हा कोट कोणत्याही पृष्ठभागावर, कपड्यावर करता येईल. या कोटचा वापर करून मास्क, पीपीई किटही बनवता येऊ शकतील. दवाखाना, कार्यालय, घर आदींच्या भिंती किंवा काचेचे पार्टिशन, दरवाजे, पडदे यावर हे नॅनो कोटिंग करता येते. यामुळे कोविड किंवा सार्स फॅमिलीमधील विषाणूंचा प्रादुर्भाव रोखता येतो, असा संशोधकांचा दावा आहे.

नॅनो सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. किरणकुमार शर्मा प्रकल्पाचे प्रमुख आहेत. याशिवाय विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रमोद पाटील आणि सहायक प्रा. डॉ. किरण पवार या प्रकल्पावर संशोधन करत आहेत. 

असे रोखणार विषाणू 
कोरोनाबाधित व्यक्ती शिंकली किंवा खोकली की थुंकीवाटे कोविडचे विषाणू त्या ठिकाणी पसरतात. त्या ठिकाणी ते चिकटून राहतात. अन्य व्यक्तींचे हात तेथे लागले तर पुढे संसर्गाची साखळी तयार होण्याची भीती असते. अशा ठिकाणी नॅनो कोटिंग असेल तर हे विषाणू चिकटून राहत नाहीत. विशिष्ट पॉलिमरमुळे ते निष्क्रिय होतात. यामुळे कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव रोखता येतो, असा संशोधकांचा दावा आहे. 

नॅनो कोटिंगचे प्रकार 

  • डीप कोटिंग - कोणत्याही पृष्ठभागावर 
  • स्प्रे कोटिंग - काचेवरील 10 मायक्रॉनचा पारदर्शक कोट 
  • इलेक्‍ट्रो स्पिनिंग - प्रक्रिया केलेल्या पॉलिमरचे 200 ते 300 नॅनो मीटरचे धागे 

भविष्यात विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. त्या दृष्टिकोनातून नॅनो स्कूल ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये सुरू असणारे हे मूलभूत संशोधन आहे. नॅनो कोटिंग केल्यामुळे कोविडसह सार्स फॅमिलीमधील विषाणूंना रोखणे शक्‍य होईल. 
- प्रा. डॉ. किरणकुमार शर्मा, उपसंचालक, नॅनो स्कूल ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT