कोल्हापूर

इकड़े आड़ तिकडे विहिर.... कुठल्या जिल्ह्यातील सर्वसाधारण रुग्णांची स्थिती झालीय बिकट... वाचा

शिवाजी यादव

कोल्हापूर : सेवा रुग्णालय फुल्ल... सीपीआरमध्ये फक्त कोरोनावर उपचार होत असल्याने सर्दी, खोकला, ताप किंवा पोटविकार, डोकेदुखी आदी आणि अन्य आजारांची लक्षणे दिसली तरी कुठेही गेले की, पहिल्यांदा स्वॅब तपासणीचा आग्रह होतो. खासगी रुग्णालयात जायचे तर बिलांची चिंता. गल्लीत क्‍लिनिक कुठे चालू तर बहुतेक बंद अशा स्थितीत ज्यांच्याकडे पैसे नाहीत, कोरोनाची लक्षणे सोडून अन्य आजार आहेत, अशा रुग्णांची कोंडी झाली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र सर्वसाधारण असेच चित्र आहे.

सीपीआरमध्ये लहान मोठ्या शस्त्रक्रिया, मोफत उपचार होतात. एकाच छताखाली बहुविध तज्ज्ञ डॉक्‍टर सेवा देतात. त्यामुळे हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी वरदान ठरते. सध्या सीपीआर रुग्णालयात फक्त कोरोनावर उपचार सुरू आहेत. रोज किमान सरासरी साडेचार हजारांच्या पुढे कोरोनाबाधित सापडत असल्याने सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. 

सीपीआरमध्ये रोज किमान 450 वर रुग्ण येत होते. यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण सेवा रुग्णालयात जात आहेत. तिथे 50 बेड असल्याने तिथेही जागा नाही. त्यामुळे बहुतेकांना खासगी रुग्णालयात जावे लागते. त्यातील महात्मा फुले जीवनदायी योजना असलेली हॉस्पिटलही फुल्ल आहेत तर काही ठिकाणी रुग्णांना लक्षणे बघून प्रवेश दिला जातो तर काही ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. इथेही रुग्णांची कोंडी होते. 

मोठ्या खासगी रुग्णालयात जायचे तर 15 ते 20 हजारांच्या पुढे उपचार खर्च असेल तर तोही टाळण्याचे वेळ काही लोकांवर आली आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने बेड उपलब्ध करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे; मात्र तिथेही कोरोनाबाधितांसाठी प्राधान्य आहे. अशात अन्य विकारातील लोकांना किफायतशीर दरात किंवा मोफत उपचार सेवांचा लाभ घेता येणेही मुश्‍कील बनले आहे. 

बहुतांश खासगी दवाखाने बंद 
जिल्ह्यात जवळपास अडीच हजारांवर खासगी क्‍लिनिक आहेत. यातील निम्म्यापेक्षा अधिक बंद आहेत. ज्या क्‍लिनिकमध्ये उपचार सेवा सुरू आहे त्यांच्याकडे नियमीत स्वरूपाचा सर्दी, खोकला, ताप, पोटदुखीवर उपचार करून रुग्णाला बरेही केले जाते. मात्र एका गावात दहापैकी चार क्‍लिनिक सुरू आहेत. त्यामुळे तिथेही गर्दी आहे. त्यामुळे अन्य क्‍लिनिक वेळीच सुरू होण्याची प्रतीक्षा रुग्णांना आहे. 

संपादन ः विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT