कोल्हापूर

व्हाईट आर्मी अन्नछत्राचा सव्वा लाखांवर लोकांना लाभ

प्रतिनिधी

कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे हातावरच्या पोटांना उपाशी राहायची वेळ आली आहे. त्याशिवाय परराज्यातील अनेक कामगार शहरात अडकून पडले आहेत. त्यांसाठी येथील व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी गजेन्द्र प्रतिष्ठानचे अरविंद देशपांडे, महापालिका, क्रेडाई व समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीच्या सहकार्याने अन्नछत्राचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आजअखेर सव्वा लाखांवर लोकांना दोन वेळच्या जेवणाचा लाभ मिळाला आहे. 
गांधीनगर, हेर्ले (ता. हातकणगले), उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, शाहू टोल नाका, गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील कामगार, मार्बल्स मेटलची तीन युनीट, नेर्ले, तामगाव, कणेरीवाडी येथील एमआयडीसी युनिट, कोगनोळी नाका, निपाणी व जय हिंद धाबा शेजारील कामगारांना या उपक्रमांतर्गत जेवण दिले जात आहे. शिरोली ते कोगनोळी टोल नाका, रामानंदनगर, आयसोलेशन माळ, सम्राटनगर, पंचगंगा नदी घाट, संकल्प सिद्धी कार्यालय शेजारील परिसर, जिवबा नाना जाधवपार्क शेजारील परिसर, टेंबलाईवाडी, गंगावेश, आर. के. नगर- मोरेवाडी, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, शिंगणापूर पाणंद, कनाननगर, सदर बाजार वारांगणा, पितळी गणपती, कसबा बावडा, राजारामपुरी, राजोपाध्येनगर, पोदार स्कूल, शिवाजी विद्यापीठ परिसर, कंजारभाट, मैलखड्डा, जोशीनगर झोपडपट्टी, मंगळवार पेठ, वळिवडे, फुलेवाडी सुतार मळा आदी परिसरातील कामगारांनाही जेवण पुरविले जात आहे. 

28 मार्चपासून रोज वाटप 
जिल्ह्यातील कोरोना बाधित संशयित रुग्ण व नातेवाईकांनाही ही सेवा उपलब्ध केली असून आज एकूण 760 किलो तांदूळ शिजला आणि सहा हजार लोकांना त्याचे वाटप झाले. 28 मार्चपासून हा उपक्रम सुरू असून दोन वेळचे मिळून आजअखेर अडीच लाखांवर लाभार्थी झाल्याचे अशोक रोकडे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shikhar Dhawan: कायदेशीर सामना धवनने जिंकला! पहिल्या बायकोकडून मिळणार ५.२ कोटी, आयेशासाठी वाढल्या अडचणी

Holi 2026: होळीवर ग्रहणाचा वेळ किती असेल? भद्रा कधीपर्यंत राहील, होलिका दहनाचा मुहूर्त येथे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : दुष्ट आणि अनैतिक व्यक्तीला शंकराचार्य म्हणणे हा सनातन धर्माचा घोर अपमान

Agricultural News : कांदा उत्पादकांसाठी गुड न्यूज! निर्यात शुल्कातील जाचक अटी हटवल्या; आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा कायम राहणार

Kagal Accident : पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; कागलच्या ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT