White Army soldier Serious in a hooligan attack Crime on four strangers 
कोल्हापूर

महाड येथील दुर्घटनेतील मदतकार्य बजावून परतणाऱ्या व्हाईट आर्मीच्या जवानांवर गुंडांचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : व्हाईट आर्मीच्या जवानावर चार दारूड्या गुंडांनी हल्ला करून डोक्‍यात दगड घातला. त्यात जवान गंभीर जखमी झाला. प्रेम पीतांबर सातपुते (वय २०, रा. कळंबा) असे जखमीचे नाव आहे. संभाजीनगर वारे वसाहत येथे मध्यरात्री हा प्रकार घडला. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली.


जवान प्रेम सातपुते महाड येथील दुर्घटनेतील मदतकार्यात कामगिरी बजावून बुधवारी रात्री परतले. त्यानंतर सातपुते ते वारे वसाहतीच्या पिछाडीस असणाऱ्या कोविड अन्नछत्र सेंटरवर झोपण्यास दुचाकीवरून जात होते.

मध्यरात्री वारे वसाहतीजवळ रस्त्याकडेला मद्यपी गुंड बसले होते. त्यातील चौघांनी त्यांना अडवून हल्ला केला. एकाने त्यांच्या डोक्‍यात दगड घातला. यात सातपुते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी सातपुते यांची सुटका केली. सातपुते यांनी सहकाऱ्यांना दिली. त्यांना सेवा रुग्णालयात दाखल केले. सातपुते यांच्या फिर्यादीनुसार चौघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला. हल्लेखोरांनी अन्य काहींना मारहाण केल्याची चर्चा होती. तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT