Shoumika Mahadik  
कोल्हापूर

Shoumika Mahadik : गोकुळमध्ये बंटी पाटील गटाला धडक देणाऱ्या शौमिका महाडिक नेमक्या कोण?

शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं माजी अध्यक्षपद भूषवलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं माजी अध्यक्षपद भूषवलं आहे.

Who is Shoumika Mahadik : यंदाही गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे वादळी ठरली. सत्ताधारी सतेज पाटील, हसन मुश्रीफ गट विरुद्ध महाडिक गट असा सामना आज बावड्यातील महासैनिक दरबार हॉलमध्ये रंगल्याचे पहायला मिळाले. महाराष्ट्रातील आघाडीचा दूध संघ म्हणून गोकुळकडे पाहिले जाते. गोकुळची निवडणूक ते गोकुळचा कारभार आणि कारभारी यांच्याकडे नेहमीच अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते.

आजच्या सभेतही दरवर्षीप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील खंडाजंगी पहायला मिळाली. सभेसाठी विरोधक सभासदांना बसण्यास जागा न दिल्याने महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ज्या सभासदांनी आम्हाला निवडून दिलं, त्यांच्यासाठी जागा नसेल तर मी मंचावर येणार नाही, असं शौमिका महाडिक म्हणाल्या. दरम्यान, यावेळी महाडिक घराण्याचं शक्ती प्रदर्शनही पहायला मिळालं.

आज या सभेत आक्रमक भूमिका घेतली होती विरोधी पक्षातील शौमिका महाडिक यांनी. कोण आहेत या शौमिका महाडिक? शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे दीर आहेत. शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं माजी अध्यक्षपद भूषवलं आहे. त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. (who is shaumika mahadik gokul kolhapur)

सभा शांततेत पार पडावी, सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे समर्पक मिळावीत, अशी आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया गोकुळच्या संचालिका आणि महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांनी मांडली आहे. या सर्वसाधारण बैठकीत सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत तेच आम्ही मांडणार आहोत. वर्षभरात उत्पादक आमच्याकडे आले आहेत. त्यांचेही काही प्रश्न आहेत. साध्या प्रश्नांची व्यवस्थित मिळावीत, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी आज नमूद केले होते.

मागील वर्षी मे महिन्यात गोकुळ दूधसंघाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महाडिक गटाकडून त्यांनी 43 मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी शौमिका महाडिक आणि सतेज पाटील-मुश्रीफ गटाच्या अंजना केदारी रेडेकर यांच्यात चुरस झाली होती. शौमिका महाडिक गेल्यावर्षी पहिल्यांदाच गोकुळच्या संचालक म्हणून निवडून आल्या होत्या. तेव्हापासून त्यांनी गोकुळ दूध संघाच्या प्रश्नांवरुन सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT