Kolhapur Lok Sabha Election esakal
कोल्हापूर

Kolhapur Politics : विधानसभेत संजय मंडलिक कोणाचा फेडणार पैरा? मुश्रीफ की घाटगे? दोन्ही नेत्यांकडून जोरदार तयारी

कागल तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा लोकसभा निवडणुकीत जोरदार फटका बसला आहे.

सुनील पाटील

लोकसभा निवडणुकीत कागलमधून महाविकास आघाडीला मिळालेली कमी मते दखल घेण्यासारखी आहेत. नेत्यांच्याच कागल शहरातही मंडलिक यांना खूपच कमी मतदान झाले आहे.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha Election) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पराभवाला जबाबदार आणि दोषी कोण, यावर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंडलिकांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या मुश्रीफ आणि घाटगे यांच्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा पैरा फेडायचा, हा माजी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यासमोर मोठा प्रश्‍न असणार आहे.

कागल तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा लोकसभा निवडणुकीत जोरदार फटका बसला आहे. हाच शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्‍न सत्तेत असलेल्या मुश्रीफ (Hasan Mushrif) किंवा घाटगे यांनी राज्य किंवा केंद्र सरकारला विचारण्याएेवजी जनतेसमोर बोलून दाखवत आहेत. काहीही झाले तरी शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध करणे हाच दोन्ही नेत्यांच्या अजेंड्याचा विषय ठरवल्याचे दिसत आहे.

महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे वरिष्ठ नेते सांगत असले तरीही प्रत्यक्ष मैदानातील चित्र वेगळे असणार आहे. मुश्रीफ आणि घाटगे यांन आत्तापासून प्रचार यंत्रणा गतीमान केली आहे. पालकमंत्री मुश्रीफ म्हणतात काहीही झाले तरी शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा लागेल आणि मी भाजपचा नेता म्हणून नव्हे तर कागलकर म्हणून शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध करणार म्हणून लोकांचा विश्‍वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुती म्हणून एकत्र आलेले मुश्रीफ, घाटगे आणि मंडलिक गट हे विधानसभा निवडणुकीत एकत्र असतीलच असे नाही.

विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ आणि घाटगे यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांना मदत केली म्हणतात. त्यामुळे गटा-तटाचे राजकारण असणाऱ्या कागल तालुक्यात मंडलिक पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासोबत राहणार की श्री घाटगे यांच्यासोबत जाणार याची चर्चा सुरू आहे. माजी खासदार मंडलिक यांनी मुश्रीफ किंवा घाटगे यांच्यापैकी एकाला जरी पाठिंबा दिला तर दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते नाराज होणार आहेत.

महाविकास आघाडीकडून माजी आमदार संजय घाटगे किंवा गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे रिंगणात असू शकतील, हे मुश्रीफ आणि घाटगे यांना विसरून चालणार नाही. कागलमधून महायुतीला महाविकास आघाडी जोरदार टक्कर देईल, असे वातावरण लोकसभा निवडणुकीत निर्माण झाले आहे.

म्हणून ‘शक्तिपीठ’ला विरोध करण्याचे धोरण

लोकसभा निवडणुकीत कागलमधून महाविकास आघाडीला मिळालेली कमी मते दखल घेण्यासारखी आहेत. नेत्यांच्याच कागल शहरातही मंडलिक यांना खूपच कमी मतदान झाले आहे. हाच पॅटर्न विधानसभेत राहू नये, यासाठीच मुश्रीफ आणि घाटगे यांनी गावा-गावांत जाऊन लोकांशी चर्चा करत आहेत. यातूनच दोन्ही नेत्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Rising Stars: तिलक वर्माच्या भारतीय संघाचं आव्हान सेमीफायनलमध्येच संपलं! श्रीलंकेकडून दारुण पराभव

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

SCROLL FOR NEXT