Ashok Chavan vs Sambhaji Bhide esakal
कोल्हापूर

Ashok Chavan : भाजप नेते म्हणतात आम्ही भिडेंच्या मताशी सहमत नाही, मग कारवाई का करत नाही? अशोक चव्हाणांचा थेट सवाल

संभाजी भिडेंसारखा माणूस महात्मा गांधी, महात्मा जोतिराव फुले यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहे.

सकाळ डिजिटल टीम

इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यावे ही माझी वैयक्तिक भूमिका आहे; पण याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेला अडीच महिन्यांपासून आयुक्त नसेल तर शासन आमच्या दारी कधी येणार? असा सवाल करत सध्या घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणी दुष्काळ अशी सरकारची स्थिती असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण (Ashokrao Chavan) यांनी केली.

केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने पाच ट्रिलिएन अर्थ व्यवस्था करण्याचा संकल्प केला आहे. उद्योग, सेवा, बांधकाम क्षेत्रात हे शक्य असते. ग्रामीण भागातील साखर कारखाने, बँका, पतसंस्था, सेवासंस्था चांगल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवावे यात शंका नाही; पण सरकारी हस्तक्षेप कमी झाला पाहिजे.

राज्यात अनेक बँका, नागरी बँका राजकीय भूमिकेतून आडवा-आडवी झाली तर पाच ट्रिलिएनचे स्वप्न मागे पडू शकते. गोकुळ दूध संघाचा नावलौकिक आहे. सत्ता कोणाचीही असो काही चुकी असतील त्यावर अंकूश ठेवला पाहिजे, यात दूमत नाही.

मात्र, सहकारच चळवच मोडित काढायचे धोरण असेल तर चुकीचे आहे. पाच वर्षाने निवडणूक असते. ज्यांना संस्थेचा कारभार करायचा आहे, त्याने निवडणूक लढवावी आणि सत्ता घ्यावी पण अशा संस्था मोडित काढण्यासाठी प्रयत्न करु नये, असे चव्हाण यांनी सांगितले.

लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी प्रयत्न

इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यावे ही माझी वैयक्तिक भूमिका आहे; पण याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. ते सोबत आले तर त्यांचा आघाडीला फायदा होईल. तसेच जिल्ह्यातील एखादा ज्येष्ठ नेता लोकप्रिय असेल तर त्याला तिकिट देण्याचा मुद्दा समोर येवू शकतो. मात्र, कोल्हापूरच्या दोन्ही जागा काँग्रेससाठी मिळाव्यात यासाठी प्रयत्न केला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत शंका

सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर याचा परिणाम होईल अशी भीती सरकारला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा झाल्याशिवाय या निवडणुका घेतात की नाही याबद्दल शंका आहे. अडीच वर्ष झाले कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत नाही. तसेच, महाराष्ट्रात ज्यापध्दतीने राजकीय तोडफोड सुरू आहे. यावरुनच भाजपने चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे.

मग भिडेंवर कारवाई का करत नाही?

संभाजी भिडेसारखा माणूस महात्मा गांधी, महात्मा जोतिराव फुले यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहे. सामाजिक विषयांवर वाद निर्माण करत असेल तर शासनाने अशा व्यक्तिला विनाविलंब अटक केली पाहिजे. भाजपचे नेते म्हणतात आम्ही भिडेंच्या मताशी सहमत नाही, मग कारवाई का करत नाही? असा सवाल चव्हाण यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT