This will be the practical examination of Polytechnic, Pharmacy 
कोल्हापूर

पॉलिटेक्‍निक, फार्मसीची प्रात्यक्षिक परीक्षा अशी होणार

दिपक कुपन्नावर


गडहिंग्लज,कोल्हापूर  ः पॉलिटेक्‍निक, डी.फार्मसी अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कोरोनामुळे यंदा प्रथमच होणाऱ्या परिक्षा ऑनलाईन होत आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे मंगळवारपासून (ता.15) प्रात्यक्षिक तर पाच आक्‍टोंबरला लेखी परिक्षेला प्रारंभ होणार आहे. तृतीय वर्षातील विद्यार्थ्याच्या बॅकलॉग विषयांची परीक्षा 25 सप्टेंबर ते 4 आक्‍टोंबर अखेर संस्थास्तरावर होणार आहे. 
दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पॉलिटेक्‍निक, डी. फार्मसीच्या परीक्षा होतात. मात्र, यंदा कोरोनामुळे मार्चपासूनच शैक्षणिक कामकाज बंद झाले. वर्षभरातील आढावा आणि यापुर्वीची कामगिरी याच्या आधारे पहिल्या, दुसऱ्या वर्षांचा निकाल लावण्यात आला. पंरतू, सर्वोच्च न्यायालयाने सर्वच अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे तृतीय वर्षाच्या परीक्षा होत आहेत. 
प्रात्यक्षिक परीक्षाही 15 ते 25 सप्टेंबर अखेर ऑनलाईन प्रणालीचा वापरुन तोंडी पध्दतीने संस्थास्तरावर घेण्याची सुचना आहे. यासाठी विविध मिटींग ऍप्लीकेशन, टेलिफोनिक पर्यायही देण्यात आले आहेत. हे पर्याय अपुरे पडल्यास विद्यार्थ्याचे सत्रकर्म, जर्नल्स, निरंतर मुल्यमापनावर गुण दिले जातील. नियमित विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 5 आक्‍टोंबरपासून सुरु होईल. परीक्षा ऑनलाईन बहुपर्यायी स्वरुपाची असेल. विद्यार्थ्यांना 40 पैकी 30 प्रश्‍न सोडविणे आवश्‍यक आहे. प्रत्येक प्रश्‍नाला 1 गुण असुन त्यासाठी एक तासाचा कालावधी आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लेखी परिक्षेकरीता इंटरनेट, संगणक, मोबाईल सुविधा उपलब्ध नाहीत, अशासाठी जवळच्या तंत्रनिकेतनात परिक्षेची सुविधा केली जाणार आहे. ऑनलाईन परिक्षा देऊ शकणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 31 आक्‍टोंबरला निकाल जाहीर होणार आहे. 

संस्थेशी संर्पक महत्वाचा 
गेल्या सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांचा आपपल्या महाविद्यालयाशीं थेट संर्पक नाही. ऑनलाईन परिक्षा असल्याने महाविद्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. पंरतू, परिक्षा पध्दती, त्याचे वेळापत्रक, वेळोवेळी होणारे बदल यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, विभागातील शिक्षकांशी सतत सर्पकांत राहण्याची गरज राज्य तंत्र शिक्षण मंडळाने व्यक्त केली आहे.

संपादन -यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

Leopard Terror: मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

SCROLL FOR NEXT