Will she get compensation or not? 
कोल्हापूर

ती नुकसानभरपाई मिळणार की नाही?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गतवर्षी आलेल्या महापुरामुळे शहरासह उपनगरे पाण्यात गेली. घरांची पडझड झाली. संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले, तर अनेकांच्या घरात साथीचे आजार उद्भवले अशा स्थितीत संबंधितांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात येणार होती. त्यापैकी फक्त पाच हजार रूपये अनेकांना मिळाले. मात्र, उर्वरित दहा हजार रूपयांची अद्यापही प्रतीक्षा आहे. ही नुकसानभरपाई मिळणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. 

पंचगंगानदी बरोबर शहरातील जयंती नाल्यालाही पूर आला. त्याचे पाणी शहरातील मध्यवर्ती भागात घुसले तर उपनगरात जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, बापट कॅम्प, कदमवाडी, भोसलेवाडी आदी परिसरात आले. या पाचही वसाहतीच्या मागील बाजूला असलेल्या शेतवडीत मोठ्या अर्पाटमेंट आहेत तेथे अनेक लोक वास्तव्यास आहेत. तेही पूराच्या पाण्यात अडकले. त्यांना महापालिका अग्नीशामक दलाच्या बोटीतून बाहेर काढले गेले. 
त्यानंतरही दहा ते पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ पूराचे पाणी परिसरात तुंबलेले होते.अशा स्थितीत अतोनात नुकसान सोसवे लागले. जिल्हा प्रशासनाने संबधित घरांचे पंचनामे केले. त्यानंतर अवघ्या दोन तिन दिवसात पाच हजार रूपयांची मदत देण्यात आली तर पंचनाम्यासोबत प्रत्येकांच्या बॅंक खात्याची माहिती घेतली होती. तेव्हा संबधितांच्या खात्यावर दहा हजार रूपये जमा होतील असे सांगण्यात आले होते. त्यापैकी काही मोजक्‍यांना दहा हजार रूपये मिळल्याचे सांगण्यात येते. मात्र, अनेकांच्या घरात पाच दिवसापेक्षा अधिककाळ पुराचे पाणी होते तसेच नुकसानही झाले. त्यांना उर्वति दहा हजार रूपयांची मदत अद्याप मिळालेली नाही. अनेकजण सतत बॅंकेत चौकशी करतात. काहींनी जिल्हा प्रशासनाकडेही चौकशी केली. मात्र, स्पष्ठ उत्तर मिळत नसल्याने संभ्रम वाढला आहे. 


जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत अवती भोवतीच्या भागात पूराचे पाणी दिर्घकाळ होते. नुकसान झालेल्यांचे पंचनामे झाले. काहींना पाच हजार रूपये मिळालेत, उर्वरित दहा हजार रूपये अनेकांना मिळालेले नाहीत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना पंचनाम्यांच्या आधारेही भरपाई मिळावी, अशी मागणी करीत आहोत. 
राजसिंह शेळके, नगरसेवक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT