Will there be lockdown in Kolhapur or not The decision will be made by evening 
कोल्हापूर

कोल्हापुरात लॉकडाऊन होणार की नाही? सायंकाळपर्यंत होणार निर्णय 

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसें-दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. कोरोना वाढीचा दर हाताबाहेर जाण्याआधीच विचार करायला हवा, अशा काही नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिल्या. तर, कोरोनाचा उपचार घेणाऱ्या 665 जणांसाठी लॉकडाऊन करुन जिल्ह्यातील 38 लाख लोकांना क्वारंटाईन करणार का? असा सवाल काहीजणांनी उपस्थित केला. त्यामुळे कोल्हापूर लॉकडाऊनबाबत आज ऑनलाईन झालेल्या चर्चेमध्ये समिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दरम्यान, सायंकाळपर्यंत यावर निर्णय घेणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितली. प्रत्येक दिवशी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन गरजेचे आहे. असा एक मतप्रवाह आहे. तर, 665 लोकांसाठी लॉकडॉऊन करणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच, सध्या 665 कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. तर एकूण 1338 लोकांना कोरोना झाला आहे. यामध्ये टेस्ट कमी झाले आहेत. त्या वाढवल्या पाहिजेत त्यामुळे काही कडक नियम करा, टेस्ट वाढवा, पण लॉकडाऊन आता जिल्ह्याला परवडणारे नाही, असाही एक मतप्रवाह होता.

दरम्यान, यामध्ये जिल्ह्यातील आमदार व खासदार यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी सहभाग घेतला. सायंकाळीपर्यंत ठोस निर्णय घेतला जाणार आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

SCROLL FOR NEXT