Without Using Eight Kilowatts Of Electricity A Day To Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला दररोज आठ किलोवॉट वीज वापराविना

अवधूत पाटील

गडहिंग्लज : येथील पंचायत समितीने सौर ऊर्जा प्रकल्प राबविला आहे. यातून निर्माण होणाऱ्या विजेवरच वर्षभरापासून कामकाज सुरू आहे. त्यामुळे वीज बिलात मोठी बचत झाली आहे. मात्र, या प्रकल्पातून दररोज 20 किलोवॉट विजेची निर्मिती होते तर प्रत्यक्ष वापर 11 ते 12 किलोवॉट इतकाच आहे. त्यामुळे दररोज आठ किलोवॉट वीज वापराविना राहत आहे. या अतिरिक्त विजेचा वापर झाल्यास पंचायत समितीला उत्पन्नाचे एक नवे साधन उपलब्ध होऊ शकेल. 

पंचायत समितीने तीन वर्षांपूर्वी नवी सुसज्ज इमारत उभारली आहे. या इमारतीतून ग्रामीण जनतेशी निगडित असणारे विविध वीस विभागांचे कामकाज चालते. पंचायत समितीला विद्युत वितरण कंपनीकडून वीज पुरविली जात होती. त्यापोटी दरवर्षी सुमारे दोन लाख रुपये वीज बिल भरावे लागत होते. यावर मार्ग काढण्यासाठी पंचायत समितीने गतवर्षी सौर ऊर्जा प्रकल्प राबविला. अशा प्रकारचा प्रकल्प राबविणारी गडहिंग्लज पंचायत समिती जिल्ह्यात पहिलीच व एकमेव आहे. जिल्हा परिषद व महाऊर्जा यांच्या नियंत्रणाखाली पुण्यातील क्रिस्टल कार्पोरेशनने या प्रकल्पाची उभारणी केली. त्यासाठी 30 लाख 92 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

सौर ऊर्जा प्रकल्पातून दररोज 20 किलोवॉट विजेची निर्मिती होत आहे. त्यातून पंचायत समितीच्या मुख्य इमारतीतील सर्व विभाग, शेजारी असणाऱ्या शिक्षण विभागाला वीजपुरवठा केला आहे. बांधकाम व आरोग्य विभागाच्या स्वतंत्र इमारती असून त्या मुख्य इमारतीपासून दूर आहेत. त्या ठिकाणी वीजपुरवठा करणे अडचणीचे असल्याने या दोन विभागांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेपैकी 11 ते 12 किलोवॉट विजेचा वापर होत आहे. या प्रकल्पांतर्गत अतिरिक्त वीज साठवून ठेवण्याची सुविधा आहे. पण, त्यालाही मर्यादा आहे. परिणामी, अतिरिक्त वीज वापराविनाच राहत आहे. 

अतिरिक्त ठरणाऱ्या या विजेचा वापर करता येऊ शकतो. विद्युत महावितरणला ही अतिरिक्त वीज विकता येते. त्यासाठी नेटमीटरिंग करून घेणे आवश्‍यक आहे. पंचायत समितीने त्याबाबतचा प्रस्ताव विद्युत महावितरण कंपनीला दिल्यास हे शक्‍य आहे. विद्युत महावितरणकडून सध्याच्या प्रचलित दराप्रमाणे विजेची रक्कम आदा केली जाईल. यातून पंचायत समितीला उत्पन्नाचा एक नवा मार्ग निर्माण होईल. 

पोलिस, तहसील कार्यालयाचाही पर्याय... 
पंचायत समिती लगतच तहसील कार्यालय व पोलिस ठाणे आहे. सौर ऊर्जा प्रकल्पातून शिल्लक राहणारी वीज या शासकीय कार्यालयांना देता येऊ शकते. अतिरिक्त आठ किलो वॉट विजेतून या दोन पैकी एका कार्यालयाचे कामकाज निश्‍चितपणे चालू शकते. त्यामुळे या कार्यालयात सध्या वापरल्या जाणाऱ्या विजेची बचत होईल. शिवाय पंचायत समितीलाही त्यांच्याकडून उत्पन्न मिळू शकेल. 

पत्र दिले
पंचायत समितीचे कामकाज सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेवर सुरू आहे. वापरापेक्षा अधिक निर्माण होणारी वीज शिल्लक राहत आहे. ही अतिरिक्त वीज देण्याबाबत विद्युत महावितरणला पत्र दिले आहे. 
- शरद मगर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, गडहिंग्लज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT