women found death in rajaram lack crime marathi news 
कोल्हापूर

कोल्हापुरातील तलावात सापडला महिलेचा मृतदेह ; बघ्यांची गर्दी

राजेश मोरो

कोल्हापूर  : महिलेचा खून करून तिचा अर्धवट मृतदेह राजाराम तलावात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. एका पिशवीत मृतदेह असल्याचे सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कमरेच्या खालचा भागावरून त्या महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी तातडीने सुरू केले आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 
राजाराम तलाव येथे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना एका पिशवीत मृतदेहाचे अवशेष असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली.घटनास्थळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, उपनिरीक्षक समाधान घुगे यांच्यासह पथक दाखल झाले. 

पिशवी बाहेर काढल्या नंतर त्यात एका महिलेचा अर्धवट मृतदेह पोलिसांना मिळून आला. या महिलेचा खून करून तिचा अर्धवट मृतदेह पाण्यात फेकून दिल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य पाहून घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलिस उपअधीक्षक महेश चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट दिली. 

मृतदेहाचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आले आहे. ही महिला अंदाजे 60 वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिची ओळख पाठवल्या पासून खुनाचा प्रकार उघडकीस आणण्याचा तपास पोलिसांनी तातडीने सुरू केला आहे. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम राजारामपुरी पोलिस ठाण्यात सुरू आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT