women dead in spot of sanitizer bottle in kolhapur 
कोल्हापूर

घरातील कचरा पेटविताना सॅनिटायझरच्या बाटलीचा झाला स्फोट ; जखमी महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

बिद्री (कोल्हापूर) : घरातील कचरा पेटविताना त्यामध्ये पडलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. बोरवडे (ता. कागल) येथे ही घटना घडली. सुनीता धोंडिराम काशीद (वय ४०, रा. बोरवडे, दत्तनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, सुनीता काशीद या २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घरातील कचरा अंगणात पेटवित होत्या. त्यामध्ये पडलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीचा अचानक स्फोट झाला व बाटलीतील सॅनिटायझर त्यांच्या अंगावर फेकले गेले. त्यात त्यांच्या साडीने पेट घेतला. 

यामध्ये त्या ऐंशी टक्के भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या.
घरातील व शेजारी लोकांनी आग विझवून त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गेले आठवडाभर त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. शनिवारी (२) रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. ग्रामसेवक धोंडिराम काशीद यांच्या त्या पत्नी होत. सुनीता काशीद यांच्या झालेल्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत, कर्जमाफीच्या चार याद्या जाहीर; वर्ष उलटूनही ५० हजारांची मदत खात्यात जमा नाही

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT