women of piggy bank with other women but she wanted rupees 25 lakh for other women in kolhapur 
कोल्हापूर

सणासुदीच्या तोंडावर झाली फसवणूक ; पंचवीस लाख घेऊन भिशीचालक महिला गायब

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर (कोल्हापूर) : येथील एका भिशीचालक महिलेने सुमारे पंचवीस लाख रक्कम घेऊन पोबारा केला आहे. फसगत झालेल्या महिला गांधीनगर पोलिस ठाण्यावर आल्या होत्या; पण संबंधित भिशीचालक महिलेवर गुन्हा दाखल झाला नाही. धुणीभांडी आणि मोलमजुरी करून जमवलेली रक्कम गेल्याने भिशीधारक महिलांची कोंडी झाली आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर ही फसगत झाल्याने परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

परिसरात भिशीच्या नावाखाली सावकारीचे लोण वाढत आहे. संबंधित भिशी चालवणारी महिला कोयना कॉलनीमध्ये किराणासदृश दुकान चालवत होती. त्यातून तिची अनेक महिलांबरोबर ओळख झाली. त्यातून महिलेने भिशी चालू केली. त्यामध्ये सुमारे तीनशे महिला सभासद असल्याची चर्चा आहे. काही महिलांचे दीड लाख भिशीमध्ये अडकले आहेत. संबंधित भिशी चालक महिलेने बचत गट चालवते असे सांगूनही रक्कम जमा केली होती, असे फसगत झालेल्या महिला उघडउघड सांगत आहेत.

पाच हजारांपासून लाख दीड लाख रक्कम महिलेकडे जमा केली होती. २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची चर्चा जरी सुरू असली तरी हा आकडा मोठा असण्याची शक्‍यता आहे. घरकाम आणि म्हशी पाळून काबाडकष्ट करणाऱ्या महिलेने आपली दीड लाखाची रक्कम भिशीचालक महिलेकडे असल्याचे पोलिस ठाण्यासमोरच बोलून दाखवले. जमलेल्या महिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रुंच्या धारा लागल्या होत्या.

"भिशीत फसगत झालेल्या महिलांची फिर्याद नोंदवून घेऊन तपास करणार आहोत."

- दीपक भांडवलकर, सहायक पोलिस निरीक्षक, गांधीनगर

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : आम्ही कुणाच्या विरोधात नाही, सर्वांसोबत आहोत : PM मोदी

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT