Work on 463 houses in Kolhapur city in progress 
कोल्हापूर

कोल्हापूर शहरात 463 घरकुलांचे काम प्रगतिपथावर 

युवराज पाटील

कोल्हापूर  : प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काच्या घराचे स्वप्न सत्यात उतरू लागले आहे. 2022 पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचा हेतू असून, शहरात 463 घरकुलांचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. यात पुईखडी येथील स्वप्नपूर्ती व विन्स रुग्णालयालगतच्या लोकनगरीचा समावेश आहे. 
हक्काचे छप्पर डोक्‍यावर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आर्थिक अडचणींमुळे ते बहुतेकांना शक्‍य होत नाही. किमान 300 चौरस फुटांपर्यंतचे तरी घर मिळावे, यासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविली. शहरात 64 पैकी 44 झोपडपट्ट्या घोषित आहेत. अघोषित झोपडपट्ट्यांची संख्या 10 आहे, तर नव्याने सापडलेल्या झोपडपट्टींची संख्या 10 आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गटातील लोकांना अनुदानासाठी अर्ज करता येतो. वार्षिक उत्पन्न किमान तीन लाखांपर्यंत असावे, अशी अट आहे. अनुदान देताना संभाव्य घरकुल हे घरातील कर्ता पुरुष तसेच महिलेच्या नावावर असावे, अशी अट आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी तीन लाख, अल्प उत्पन्न गटासाठी सहा ते बारा लाख, मध्यम उत्पन्न गटासाठी 12 ते 18 लाख उत्पन्नाची मर्यादा आहे. 
ज्यांना नव्याने घर घ्यायचे आहे. ज्याच्या स्वत:च्या मालकीची जागा आहे, त्याला बांधकामासाठी आणि ज्यांनी प्रत्यक्ष खरेदी केली आहे, 
अशांना योजनेत सहभागी होता येईल. जे लाभार्थी निकषात बसतात, अशा 2505 जणांना व्याजदरात सवलत दिली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन, कर्ज संलग्न व्याज अनुदान, भागिदारी तत्त्वावर परवडणारी घरे, वैयक्तिक घरकुल अनुदान, अशा चार गटातून निधी दिला जातो. 
बोंद्रेनगर, कदमवाडी, कपूर वसाहत येथे 142 घरकुलांचा प्रस्ताव होता. मात्र, त्यास स्थानिक रहिवाश्‍यांचा विरोध झाला. 
पुईखडी येथील स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पात 213, तर लोकनगरी येथे 250 घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहे. 
तुळजाभवानी कॉलनी परिसरात 234 घरकुलांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. 

अतिक्रमण नियमितचे काम 
फुलेवाडी गायरान, यादवनगर, टी. पी. स्कीम क्रमांक पाच, कसबा बावडा व मातंग वसाहत येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुले साकारली जातील. 

प्रधानमंत्री आवास योजना ही सर्वांसाठी आहे. निकष पूर्ण केल्यानंतर किमान अडीच लाखांचे अनुदान मिळू शकते. त्यामुळे ज्यांना घरे हवे आहे. ज्यांची स्वतःची जागा आहे आणि बांधकाम करायचे आहे. तसेच प्रत्यक्ष घर खरेदी केले आहे, जे निकष पूर्ण करतात, अशांनी शिवाजी मार्केट येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. 
- नारायण भोसले, कार्यकारी अभियंता.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT