The Work Of The Ambeohol Dam Was Again Closed Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आंबेओहोळ धरणाचे काम पुन्हा बंद पाडले 

सकाळवृत्तसेवा

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आहे. मात्र पुनर्वसनचे काम रखडले आहे. पुनर्वसन झाल्यावरच काम सुरू करावे, या मागणीसाठी आंबेओहळ विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रकल्पाचे काम बंद पाडले. प्रकल्पग्रस्तांनी 4 फेब्रुवारीला प्रकल्पाचे काम बंद पाडले होते. आश्‍वासनानंतर ते सुरू झाले, मात्र पुनर्वसनबाबत ठोस निर्णय न झाल्याने आज प्रकल्पस्थळावर जावून पुन्हा बंद पाडण्यात आले. 

आठ दिवसापुर्वी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना परिषदेतर्फे निवेदन दिले होते. मात्र पुनर्वसनबाबत निर्णय झाला नाही. आज सकाळी प्रकल्पग्रस्त प्रकल्पस्थळावर जमले. 

यावेळी प्रकल्पग्रस्थांबरोबर चर्चा करण्यासाठी पुनर्वसन अथवा महसूल विभागाचे कोणीही उपस्थित नव्हते यामुळे प्रकल्पग्रस्थांनी काम थांबवले. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सचिन पावले, संतोष बेलवाडे, महादेव खाडे, आनंदा पावले, राजू देशपांडे, मधूकर पोटे, अमोल बांबारे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन सिंदूर'च्या नायकाकडे राम मंदिराची जबाबदारी, निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा ट्रस्टचे नवे CEO

Dilip Walse Patil : डिंभे-माणिकडोह बोगद्याला विरोध कायम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका, 'थोडा वेळ देऊ, त्यानंतर पुढील रणनीती ठरवू'

Mumbai Sawantwadi Express : आजपासून मुंबई-सावंतवाडी रोजची एक्स्प्रेस धावणार! सीएसएमटी येथे मुख्यमंत्री फडणवीस दाखवणार हिरवा झेंडा

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

SCROLL FOR NEXT